IPL 2025: 'This' sound will echo at Eden Gardens during the IPL opening ceremony; 'These' Bollywood stars will shine..
IPL 2025 : आयपीएल 2025 चा थरार सुरू होण्यासाठी अगदी काही दिवस राहिले आहेत. आता चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. आयपीएलचा 18 हंगाम 22 मार्च रोजी सुरू होणार आहे. पहिला सामना दोन दिवसांनी म्हणजेच 22 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात ईडन गार्डनवर होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व्यतिरिक्त मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांचा समावेश आहे. यंदाचा आयपीएलचा उद्घाटन सोहळा मोठ्या दणक्यात होणार आहे. यसाठी मोठ मोठे बॉलीवूड कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.
आयपीएलपूर्वी भारतीय खेळाडू आणि चाहत्यांच्या उत्साह शिगेला पोहचलेला दिसून येत आहे. उल्लेखनीय आहे की नुकतेच भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद पटकावले आहे. अशा परिस्थितीत यंदाच्या हंगामात खेळाडू आत्मविश्वासाने भरलेले आहेत. 22 मार्च रोजी होणाऱ्या सामन्यापूर्वी आयपीएल 2025 च्या उद्घाटन समारंभाचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात चित्रपट जगतातील अनेक स्टार्स सहभागी होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन पॉप बँड वन रिपब्लिकला आयपीएलमध्ये आणखी रंग भरण्यासाठी संपर्क साधण्यात आला आहे. तसेच, हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, शाहरुख त्याच्या केकेआरच्या उद्घाटन सामन्यात सहभागी होणार आहे. याशिवाय प्रियांका चोप्रा, सलमान खान, अरिजित सिंग आणि श्रद्धा कपूर सारखे स्टार्स देखील हजर राहण्याची शक्यता आहे. आयपीएलमधील त्याच्या ‘एक्स’ खात्यात गायिका श्रेया घोषाल आणि अभिनेत्री दिशा पटानीच्या आगमनाची पुष्टी करण्यात आलिया आहे.
Brace yourself for a symphony of magic like never before as the soulful Shreya Ghoshal takes the stage at the #TATAIPL 18 Opening Ceremony! 😍
Celebrate 18 glorious years with a voice that has revolutionised melody🎶@shreyaghoshal pic.twitter.com/mJB9T5EdEe
— IndianPremierLeague (@IPL) March 19, 2025
हेही वाचा : IPL 2025 : CSK साठी MS DHONI रचणार इतिहास; ‘या’ दिग्गज खेळाडूच्या स्थानाला धोका..
मात्र, श्रेया घोषाल आणि दिशा पटनी व्यतिरिक्त कोणाचे आगमन होणार याबाबत मात्र अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. पण सलमान खान त्याच्या आगामी ‘सिकंदर’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या मोठ्या कार्यक्रमात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय शाहरुख खान, विकी कौशल, संजय दत्त, अरिजित सिंग, प्रियांका चोप्रा, श्रद्धा कपूर आणि वरुण धवन हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
आयपीएल 2025 चा पहिला सामना 22 मार्च रोजी म्हणजेच शनिवारी खेळला जाणार आहे. हा सामना गतविजेत्या केकेआर आणि आरसीबी यांच्या संघात (केकेआर विरुद्ध आरसीबी आयपीएल 2025पहिला सामना) खेळला जाईल. पहिल्या सामन्याचे आयोजन कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर करण्यात आले आहे. हा सामना केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे.