फोटो सौजन्य : Gujarat Titans
आज आयपीएल 2025 चा क्वालिफायर चा पहिला सामना खेळवला जाणार आहे. हा सामना न्यू चंदिगड येथे रंगणार आहे या सामन्यात पंजाब विरुद्ध बंगरूळ या दोन संघांमध्ये हा सामना होणार आहे. त्याआधी ऑरेंज कॅपच्या शर्यतीमध्ये टॉप पाच फलंदाज कोणते यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या. ऑरेंज कॅपच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर गुजरात टायटनचा सलामीवीर फलंदाज साई सुदर्शन आहे साई सुदर्शनने 14 सामन्यांमध्ये 679 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एक शतक ठोकले आहे त्याचबरोबर पाच अर्धशतकांचा समावेश आहे. या सीझनमध्ये त्याने 155 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. तर या यादीमध्ये दुसरा स्थानावर गुजरातच्या खेळाडूने कब्जा केला आहे.
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे त्याने 14 सामन्यांमध्ये 649 धावा केल्या आहेत यामध्ये त्यांनी सहा अर्धशतक ठोकले आहेत. शुभमन गिल याने या सिझनमध्ये 156 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. तर तिसऱ्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव तिसऱ्या स्थानावर आहे. सूर्यकुमार यादव या सीजनमध्ये सातत्याने कमालीची कामगिरी केली आहे त्याने 14 सामन्यांमध्ये 640 धावा केल्या आहेत दुसरे स्थान मिळवण्यासाठी त्याला फक्त नऊ धावांची गरज आहे.
IPL 2025 ची ट्रॉफी कोण जिंकेल? सामनावीराचा पुरस्कार कोणाला मिळेल? Shane Watson केली भविष्यवाणी
मुंबई इंडियन्सचा पुढील सामना हा 30 मे रोजी खेळवला जाणार आहे. सूर्यकुमार यादवने या 14 सामन्यांमध्ये पाच अर्धशतक मारले आहेत. त्याचबरोबर त्याने या सिझनमध्ये 167 चा स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आहे. चौथ्या स्थानावर लखनऊ सुपर जायंट्सचा मिचेल मार्श आहे त्याने 13 सामन्यांमध्ये 627 धावा केल्या आहेत यामध्ये त्याने एक शतक त्याचबरोबर सहा अर्धशतक मारले आहेत. पाचव्या स्थानावर आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली आहे विराट कोहलीने आत्तापर्यंत याची जर मध्ये आठ अर्धशतक ठोकले आहेत त्याने 13 सामन्यांमध्ये 602 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 73 नाबाद ही त्याची या सीजन मधील सर्वतम धावसंख्या आहे. विराट कोहलीला आजच्या सामन्यात ऑरेंज कॅप वर कब्जा करायचा असल्यास त्याला अजूनही 77 धावांची गरज आहे.