फोटो सौजन्य : X
Shane Watson prediction : आयपीएल 2025 च्या क्वालिफायर मध्ये चार संघ खेळणार आहेत हे चार संघ म्हणजेच पंजाब किंग्स, गुजरात, टायटन्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स. क्वालिफायर 1 चा सामना पीबीकेस विरुद्ध आरसीबी यांच्यामध्ये रंगणार आहे तर क्वालिफायर 2 चा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये लढत होणार आहे. आयपीएल 2025 ची ट्रॉफी कोणाच्या हाती लागणार यावर हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. कारण क्वालिफायर 1 मध्ये असे दोन संघ खेळणार आहेत जे संघ कधीही ट्रॉफी जिंकले नाहीत तर क्वालिफायर 2 मध्ये एक संघ म्हणजेच गुजरातच्या संघाने एक ट्रॉफी जिंकली आहे तर मुंबई इंडियन्स संघाने पाच ट्रॉफी जिंकल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज आणि चेन्नई सुपर किंग्सचा माजी अष्टपैलू शेन वॉटसन याने आता भविष्यवाणी केली आहे आणि त्याने या सिझनचा विजेता कोण होणार यासंदर्भात अंदाज लावला आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉटसनने आयपीएल २०२५ बद्दल एक मोठी भविष्यवाणी केली आहे. वॉटसन म्हणाले की, आरसीबी यावर्षी आयपीएलचे विजेतेपद जिंकेल. त्याने असेही म्हटले की विराट कोहली सामनावीराचा पुरस्कार जिंकेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १४ पैकी ९ सामन्यांमध्ये विजय मिळवत लीग टप्प्यात दुसऱ्या स्थानावर राहिले. त्याने एकूण १९ गुण मिळवून क्वालिफायर १ साठी पात्रता मिळवली. आरसीबी ९ वर्षांनंतर पहिल्यांदाच टॉप-२ मध्ये पोहोचला आहे.
संघाच्या कामगिरीकडे पाहता, क्रिकेट पंडितांचा अंदाज आहे की आरसीबी आयपीएल ट्रॉफीचा १८ वर्षांचा दुष्काळ संपवेल. आता शेन वॉटसननेही एक मोठी भविष्यवाणी केली आहे आणि अंतिम सामन्यात आरसीबी ट्रॉफी जिंकेल आणि विराट कोहली सामनावीराचा पुरस्कार जिंकेल असे समर्थन केले आहे. त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर करताना वॉटसन म्हणाला, आयपीएल २०२५ चा विजेता आरसीबी असेल आणि मी खूप दिवसांपासून त्याबद्दल विचार करत होतो. माझ्यासाठी सामनावीर विराट कोहली आहे. मला वाटतं आता आरसीबीची वेळ आली आहे.
शेन वॉटसन पुढे म्हणाला की, स्पर्धेच्या शेवटी त्यांच्यासाठी एक वाईट बातमी होती जेव्हा काही खेळाडू जखमी झाले आणि त्यांना बदलण्यात आले. तथापि, जोश हेझलवूड प्लेऑफसाठी परत येत असल्याने, मला वाटते की हे त्यांचे वर्ष आहे.