Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : प्रीती झिंटाचा वैभव सूर्यवंशीसोबतचा फोटो व्हायरल, PBKS मालक का नाराज?

बॉलिवूड अभिनेत्री आणि पंजाब किंग्जची मालकीण प्रीती झिंटाचा राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर प्रीती झिंटा रागावताना दिसत आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 20, 2025 | 08:25 PM
फोटो सौजन्य - X

फोटो सौजन्य - X

Follow Us
Close
Follow Us:

वैभव सुर्यवंशी – प्रीती झिंटा : पंजाब किंग्सचा सामना 18 मे रोजी राजस्थान राॅयल्स यांच्याविरूद्ध पार पडला होता. या सामन्यात पंजाबच्या संघाने राजस्थान राॅयल्सच्या संघाला 10 धावांनी पराभूत केले होते. या सामन्यात वैभव सुर्यवंशी याने कमालीची खेळी खेळली. सोशल मिडीयावर अनेक एआय व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये राजकारणी व्यक्तिमत्व त्याचबरोबर अभिनेते याचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. पंजाब किंग्स आणि राजस्थान राॅयल्स या सामन्यानंतर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

IPL 2025 : मुंबईच्या संघामध्ये प्लेऑफच्या आधी केले तीन बदल! इंग्लंडला विश्वविजेता बनवणाऱ्या खेळाडूचा केला समावेश

अलिकडेच, बॉलिवूड अभिनेत्री आणि पंजाब किंग्जची मालकीण प्रीती झिंटाचा राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर प्रीती झिंटा रागावताना दिसत आहे. खरंतर, काही दिवसांपूर्वी राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात एक सामना खेळला गेला. या सामन्यानंतर प्रीती झिंटा राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंशी बोलताना आणि हस्तांदोलन करताना दिसली, त्यादरम्यान प्रीती झिंटा यांनी वैभव सूर्यवंशीशीही हस्तांदोलन केले. 

3386
ANALYSIS: Fake
FACT: Digitally manipulated images allegedly showing cricketer Vaibhav Suryavanshi hugging Bollywood actress Preity Zinta are being circulated on social media, with many users and media outlets falsely claiming them to be authentic. (1/3) pic.twitter.com/OpIZZ2ImEr — D-Intent Data (@dintentdata) May 20, 2025

काही लोकांनी या व्हिडिओमध्ये छेडछाड केली आणि तो सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने पोस्ट केला, जो नंतर व्हायरल झाला. काही लोकांनी व्हिडिओमध्ये छेडछाड केली आणि प्रीती झिंटा आणि वैभव सूर्यवंशी एकमेकांना मिठी मारताना दाखवले. या बनावट व्हिडिओवर संतापलेल्या प्रीती झिंटाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले की, “हे फोटो मॉर्फ केलेले आणि पूर्णपणे बनावट आहेत. मला आश्चर्य वाटते की न्यूज चॅनेल देखील असे बनावट आणि मॉर्फ केलेले फोटो दाखवून बातम्या देत आहेत.”

This is a morphed image and fake news. Am so surprised now news channels are also using morphed images and featuring them as news items ! — Preity G Zinta (@realpreityzinta) May 20, 2025

सामन्यानंतरचा मूळ व्हिडिओ राजस्थान रॉयल्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता. ज्यामध्ये प्रीती प्रथम यशस्वी जयस्वालला भेटते, त्यानंतर ती तिच्या टीमचा खेळाडू शशांक सिंगकडे जाते आणि तिला वैभव सूर्यवंशीला भेटायचे आहे असे सांगते. त्यानंतर प्रिती झिंटा वैभव सूर्यवंशीला भेटते आणि त्याच्याशी बोलते. तथापि, संपूर्ण व्हिडिओमध्ये प्रीती झिंटा कुठेही वैभव सूर्यवंशीला मिठी मारताना दिसली नाही.

रविवारी पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. पंजाब किंग्जने हा सामना १० धावांनी जिंकला. सामना जिंकून पंजाब किंग्जने प्लेऑफसाठीही पात्रता मिळवली.

Web Title: Ipl 2025 preity zinta photo with vaibhav suryavanshi goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2025 | 08:25 PM

Topics:  

  • IPL 2025
  • Preity Zinta
  • Vaibhav Suryavanshi
  • viral video

संबंधित बातम्या

थंडीत शेकोटीजवळ बसून व्यक्तीने नागाला शिकवल्या चार समजुतीच्या गोष्टी… अनोखं संभाषण पाहून युजर्सना आलं हसू; मजेदार Video Viral
1

थंडीत शेकोटीजवळ बसून व्यक्तीने नागाला शिकवल्या चार समजुतीच्या गोष्टी… अनोखं संभाषण पाहून युजर्सना आलं हसू; मजेदार Video Viral

INDU19 vs SAU19 Live Streaming : वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा अ‍ॅक्शनमध्ये दिसणार, वाचा कधी आणि कुठे पाहता येईल हा सामना?
2

INDU19 vs SAU19 Live Streaming : वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा अ‍ॅक्शनमध्ये दिसणार, वाचा कधी आणि कुठे पाहता येईल हा सामना?

फिटनेससाठी स्पायडरमॅन बनला! व्यक्तीने चक्क भिंतीला चिपकत मारले पुश-अप्स, युजर्स म्हणाले, “याने तर ग्रॅव्हिटीलाही मागे सारले”
3

फिटनेससाठी स्पायडरमॅन बनला! व्यक्तीने चक्क भिंतीला चिपकत मारले पुश-अप्स, युजर्स म्हणाले, “याने तर ग्रॅव्हिटीलाही मागे सारले”

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral
4

डोक्यावर तेलाचा डब्बा, शरीरावर सुकलेलं गवत अन् ज्वलंत शरीराने व्यक्तीने बाईकवर केला स्टंट; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.