फोटो सौजन्य - SunRisers Hyderabad/Rajasthan Royals सोशल मीडिया
SRH vs RR Dream11 Prediction : इंडियन प्रीमियर लीग २०२५ आज दुसरा सामना काही वेळातच सुरू होणार आहे. यामध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये संघ कागदावर मजबूत दिसत आहे. आता त्यांच्या कामगिरीवर क्रिकेटच्या चाहत्यांचे विशेष लक्ष्य असणार आहे. एसआरएच विरुद्ध आरआर यांच्यामधील सामना हैदराबादचा राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे आजचा सामन्यासाठी क्रिकेटचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. मागील आयपीएल २०२४ मध्ये हैदराबादच्या संघाने कमालीची कामगिरी करून दाखवली होती.
सनरायझर्स हैदराबादचा २०२४ मधील आयपीएलच्या कामगिरी बद्दल बोलायचे झाले तर संघाने २७० भावांचा टप्पा पार करून विक्रम मोडला होता. पण सनराइजर्स हैदराबादला आयपीएल २०२४ च्या फायनलच्या सामन्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यावेळी मुंबई इंडियन्सचा दमदार फलंदाज ईशान किशनला त्यांनी संघामध्ये सामील केले आहे तर संघ पॅट कमिशन नेतृत्वाखाली आज मैदानात उतरेल. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामधील सामन्यात जाताना कोणत्या खेळाडूंवर पैज लावावी याबाबत आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये सांगणार आहोत. आजच्या सामन्यांमध्ये तुमची ड्रीम टीम काय असू शकते यावर एकदा नजर टाका.
भारताचा फलंदाज संजू सॅमसन दमदार फॉर्ममध्ये मागील काही महिन्यात असून आहे त्यामुळे तुम्ही त्याला घेऊ शकता, तर सनरायझर्स हैदराबादच्या संघामध्ये हेनरिक क्लासेन सामील झाला आहे त्यामुळे तुम्ही त्याच्यावर देखील पैज लावू शकता. ट्रॅव्हिस हेड विस्फोटक फलंदाजी तर राजस्थान युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार रियान पराग यांना तुमच्या ड्रीम टीममध्ये सामील करू शकता. ऑल राऊंडरबद्दल बोलायचं झालं तर हैदराबादचा फलंदाज अभिषेक शर्मा याला आणि नितेश कुमार रेड्डी या दोघांना तुम्ही संघामध्ये सामील करू शकता तर राजस्थान संघामधील नितीश राणा आणि शिमरॉन हेटमायर यांचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. गोलंदाजांमध्ये ॲडम झम्पा आणि जोफ्रा आर्चर यांना तुमच्या ड्रीम टीम मध्ये तुम्ही घेऊ शकता.
विकेटकिपर – संजू सॅमसन, हेनरिक क्लासेन
फलंदाज – ट्रॅव्हिस हेड, यशस्वी जैस्वाल
अष्टपैलू – रियान पराग, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी
गोलंदाज – ॲडम झम्पा, जोफ्रा आर्चर