फोटो सौजन्य - SunRisers Hyderabad/Rajasthan Royals सोशल मीडिया
SRH vs RR Match Pitch Report : कालपासून सुरु झालेल्या आयपीएल २०२५ च्या १८ व्या सीझनच्या आजच्या या सुपर संडेमध्ये दोन सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे तर दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये लढत होणार आहे. आज सनरायझर्स हैदराबादचा संघ पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली राजस्थानविरुद्ध मैदानात उतरेल तर पहिल्या तीन सामान्यांसाठी रियान पराग संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. यामध्ये संजू सॅमसन संघासाठी फक्त फलंदाजांची भूमिका साकारणार आहे.
Hit Wicket Controversy : सुनील नरेनची बॅट स्टंपवर आदळली, तरीही आऊट नाही? जाणून घ्या घटनेमागचं सत्य
यापैकी एक सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना आहे, जो हैदराबादमध्ये खेळला जाईल. यामध्ये हैदराबादच्या मैदानांचा खेळपट्टी अहवाल काय म्हणतो ते जाणून घ्या. हैदराबादमध्ये धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांना फायदा असतो. याशिवाय, हैदराबादमध्ये वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमबद्दल बोलायचे झाले तर, येथे आतापर्यंत ७७ आयपीएल सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३४ सामने जिंकले आहेत आणि धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ४२ सामने जिंकले आहेत.
The day is here! ⚡
SRH takes on RR in our season opener!💥
Get ready for a high-voltage clash as the Orange Army sets the field on fire! 🔥#SRHvsRR pic.twitter.com/5XO75gK968— SunrisersHyd – OrangeArmy Forever (@Orangearmyforvr) March 23, 2025
येथे पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १६३ आहे. तथापि, येथे वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व दिसून येते, कारण ७०.५८ टक्के बळी जलद गोलंदाजांना मिळतात, तर फिरकी गोलंदाजांना फक्त २९.४२ टक्के बळी मिळतात. यावरून असा अंदाज लावता येतो की येथे वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व असेल आणि संघ नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतील.
आजचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना दुपारी ३:३० वाजता सुरू होईल. सामन्याचा नाणेफेक दुपारी ३ वाजता होईल. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व संजू सॅमसन करणार नाही तर रियान पराग करणार आहे.