फोटो सौजन्य - IndianPremierLeague
IPL 2025 Update : सुरू असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे 8 मे रोजी चालू सामना इंडियन प्रीमियर लीगने म्हणजेच बीसीसीआयने थांबवला आणि त्यानंतर 9 मे रोजी एक आठवड्यासाठी स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत इंडियन प्रीमियर लीगचे 58 सामने झाले आहेत. यामध्ये कॉलिफिकेशन त्याचबरोबर फायनलचे सामने पकडून 16 सामने अजूनही शिल्लक आहेत. उर्वरित सामने कधी आणि कुठे होणार यासंदर्भात अजूनपर्यंत अधिकृत माहिती बीसीसीआयने दिलेली नाही.
Mufaddal Vohra च्या सोशल मिडीया अकाऊंटवर या क्रिकेट प्रोव्हायडरच्या माहितीनुसार असं सांगण्यात येत आहे की, इंडियन प्रीमियर लीगचे शिल्लक असलेले सामने हे लवकरात लवकर आयोजित केले जाणार आहेत आणि हे सामने तीन ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत असे त्यांनी सांगितले आहे. भारतीय नियामक मंडळाने बंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद या तीन ठिकाणी उर्वरित सोळा सामन्यांचे आयोजन केले जाणार आहे असे सांगण्यात आले आहे. यासंदर्भात अजूनपर्यंत बीसीसीआयने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
🚨 IPL 2025 RESUMPTION. 🚨
– The BCCI has shortlisted Bengaluru, Chennai and Hyderabad as the 3 venues to host the remaining 16 matches of IPL 2025. (Espncricinfo). pic.twitter.com/NtVyUIlXXn
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 10, 2025
स्पर्धेत अजूनही १२ लीग सामने शिल्लक आहेत, त्यानंतर चार प्लेऑफ सामने खेळवले जातील. सुरुवातीला पहिले क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने हैदराबादमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, तर दुसरा क्वालिफायर आणि अंतिम सामना कोलकातामध्ये खेळवण्यात येईल.
मे महिन्याच्या अखेरीस स्पर्धा पुन्हा सुरू झाल्यास बहुतेक परदेशी खेळाडू परत येतील अशी फ्रँचायझींना आशा आहे, परंतु २५ मे नंतर ही मुदत वाढवली जाईल की नाही याची कोणतीही हमी नाही. प्रत्यक्षात आयपीएल २०२५ चा अंतिम सामना २५ मे रोजी कोलकाता येथे खेळवला जाणार होता. २५ मे नंतर अनेक परदेशी खेळाडूंना द्विपक्षीय मालिका खेळायच्या आहेत.
एवढेच नाही तर, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ११ जूनपासून लॉर्ड्स येथे खेळला जाणार आहे. आयपीएल २०२५ मध्ये एकूण ५७ सामने पूर्ण झाले. ५८ वा सामना ८ मे रोजी धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज (पीबीकेएस) आणि दिल्ली कॅपिटल्स (डीसी) यांच्यात सुरू होता, जो १०.१ षटकांच्या खेळानंतर रद्द करण्यात आला. तो सामना पुन्हा खेळवायचा की नाही यावर आयपीएलने अद्याप निर्णय घेतलेला नाही.