IPL 2025: 'These' young players attracted attention at the beginning of IPL 2025, performed brilliantly...
IPL 2025 : आयपीएल 2025 चा 18 वा हंगामात अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. या हंगामात आतापर्यंत एकूण पाच सामने खेळले गेले आहेत. या आयपीएलमध्ये अगदी कमी कालावधीत काही युवा खेळाडूंबद्दल खूप चर्चा होताना दिसत आहे. आपल्या कामगिरीच्या जोरावर या खेळाडूंनी जगभरात आपली दखल घ्यायला भाग पाडले आहे. यामध्ये विघ्नेश पुथूर आणि आशुतोष शर्माचा समावेश आहे. विघ्नेश पुथूरने यंदा मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले आहे. तर दुसरीकडे, आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळणारा आशुतोष शर्मा यंदा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसत आहे.
मुंबई इंडियन्सकडून खेळताना विघ्नेश पुथूरने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. मुंबई इंडियन्सला हा सामना गमवावा लागला आहे. तरी या युवा फिरकी गोलंदाजाने आपल्या दमदार कामगिरीमुळे क्रिकेट विश्वात आपली छाप पडली आहे आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तर दुसरीकडे, आशुतोष शर्मा एवढी धोकादायक फलंदाजी केली होती. एका क्षणी दिल्लीला सामना गमवावा लागतो की काय? असे वाटत असताना लखनौकडून सामना हिसकावून घेतला.
हेही वाचा : GT vs PBKS : पंजाब किंग्जने 243 धावा करूनही जीटीने जेरीस आणलं; श्रेयस अय्यरसेनेचा अडखळता विजय…
विघ्नेश पुथूर हा केरळचा रहिवासी आहे. लेगस्पिन गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. सध्या पुथूर हा खूप युवा खेळाडू आहे. या खेळाडूने आपल्या पहिल्याच आयपीएल सामन्यामध्ये खळबळ उडवून दिली आहे. या सामन्यात त्याने चेन्नईचा कर्णधार रुतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि दीपक हुडा या तगड्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. एवढ्या मोठ्या क्रिकेट मंचावर पुथूरने पदार्पणातच ३ बळी घेतले. या बदल्यात त्याने केवळ 32 धावा दिल्या.
खर तर यावेळी आशुतोष शर्माच्या परिचयाची गरज नाही. यामागचे कारण असे आहे की, आयपीएल 2025 मध्ये लखनऊ सुपर किंग्ज विरुद्ध खेळलेली त्याची खेळी. जी कुणालाच विस्मरणात जाणार नाही. त्याच्या दमदार खेळीमुळे त्याने लखनऊच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला होता. या रोमांचक सामन्यात आशुतोषने 31 चेंडूत 66 धावांची मॅचविनिंग पारी खेळली होती. या अप्रतिम खेळीसाठी आशुतोषला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 5 व्या सामन्यात पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सवर संघर्षमय विजय मिळवला आहे. या दोन संघातील सामना खूप रोमांचक असा झालेला बघायला मिळाला. या सामन्यात पंजाब किंग्सने गुजरात जायंट्सचा 11 धावांच्या फरकाने पराभव केला. पंजाबने दिलेल्या 244 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला गुजरातचा संघ 232 धावांपर्यंत मजल मारू शकला. एकेकाळी हा सामना जीटी आपलया खिशात सहज टाकेल असे वाटत असतानाच अय्यरचे कर्णधारपद आणि प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेला वेगवान गोलंदाज विजय कुमार याच्या मेहनतीला फळ मिळाले. ज्याचा परिपाक अय्यर आणि कंपनीच्या आयपीएल 2025 मधील पहिल्या विजयात झाला.