Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 Retention : फ्रँचायझींकडून ट्रेड खेळाडूंची यादी जाहीर! ‘या’ स्टार खेळाडूंनी संघ बदलले 

आयपीएल २०२६ रिटेन्शन प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्व फ्रँचायझींकडून  त्यांच्या रिटेन्शन आणि रिलीज झालेल्या खेळाडूंच्या याद्या जाहीर केल्या आहेत. यावेळी आयपीएल २०२६ मध्ये आयपीएल संघांमध्ये अनेक मोठे बदल झाले आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 16, 2025 | 07:24 AM
IPL 2026 Retention: List of traded players announced by franchises! 'These' star players changed teams

IPL 2026 Retention: List of traded players announced by franchises! 'These' star players changed teams

Follow Us
Close
Follow Us:
  • आयपीएल २०२६ रिटेन्शन प्रक्रिया पूर्ण झाली 
  • सर्व फ्रँचायझींकडून रिटेन्शन आणि रिलीज झालेल्या खेळाडूंची यादी जाहीर 
  • संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजासह मोहम्मद शमीच्या संघात बदल 

IPL 2026 Retention : आयपीएल २०२६ रिटेन्शन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्व फ्रँचायझींकडून  त्यांच्या रिटेन्शन आणि रिलीज झालेल्या खेळाडूंच्या यादी देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून आयपीएल २०२६ साठी खेळाडूंच्या ट्रेडबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती. या चर्चांना अंत एकदाच आता पूर्णविराम मिळाला असून बीसीसीआयने ट्रेड झालेल्या खेळाडूंची यादी अखेर जाहीर केली आहे. यानुसार, आगामी हंगामात केवळ जडेजा आणि सॅमसनच नाही, तर अर्जुन तेंडुलकर आणि शमी यांच्या संघात देखील बदल  झाल्याचे दिसून आले आहे. तसेच इतर ५ खेळाडूदेखील नवीन फ्रँचायझीकडून खेळताना दिसणार आहे.

हेही वाचा : IPL 2026 Retention: अखेर संजू सॅमसनची CSK मध्ये एंट्री! कर्णधारपदाने दिली हुलकावणी; ‘या’ खेळाडूच्या खांद्यावर संघाची धुरा

रवींद्र जडेजा राजस्थानकडून खेळताना दिसणार

चेन्नईच्या संघातील रवींद्र जडेजा आणि सॅम करण आता राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार आहेत तर त्याबदल्यास राजस्थानने संजू सॅमसनला चेन्नईला दिले आहे. जडेजा हा आयपीएलमधील सर्वांत अनुभवी खेळाडूपैकी एक आहे. त्याने चेन्नईसाठी एकूण १२ हंगाम खेळले आहेत. तो २०१२ पासून चेन्नईकडून खेळतो आहे. इतकेच नाही तर चेन्नईला ५ पैकी ३ विजेतेपदे जिंकून देण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे. गेल्या हंगामात चेन्नईने जडेजाला १८ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. मात्र, त्याला आता १४ कोटी रुपयांत राजस्थानने खरेदी केली आहे. मोहम्मद शमी लखनौ संघात सामील याशिवाय मोहम्मद शमी आता हैदराबादसोडून लखनौ संघाकडून खेळणार आहे. यापूर्वी तो गुजरात संघाचा भाग राहिला आहे. गेल्या वर्षी हैदराबाद संघाने त्याला १० कोटी रुपयात खरेदी केले. त्यात मॅच फीवर आता तो लखनौच्या संघाकडून खेळणार आहे. शमीने आतापर्यंत ११९ आयपीएल सामने खेळले आहेत. २०२३ च्या हंगामात त्याने १७ सामन्यात २८ विकेट घेत पर्पल कॅप जिंकली होती.

हेही वाचा : IPL 2026 Retention Live Update : कधीकाळी बलात्काराचा आरोप, संघासाठी ‘स्टार’ कामगिरी! त्याच खेळाडूला RCB ने केले रिटेन

संजू सॅमसन चेन्नईकडून खेळणार याशिवाय सॅम करणला त्याच्या पूर्वी मॅच फीमध्ये म्हणजे २.४ कोटी रुपयात खरेदी करण्यात आले आहे. २७ वर्षी सॅम करण हा ६४ आयपीएल सामने खेळले असून यापूर्वी तो पंजाबसाठी खेळला आहे. त्यानंतर त्याला चेन्नईने खरेदी केलं. आगामी हंगामात तो राजस्थानकडून खेळणार आहे. सॅमसनने राजस्थानसाठी ११ हंगाम खेळले आहेत. तो गेल्या काही हंगामात या संघाचा कर्णधारही होता. त्याने २०२२ मध्ये राजस्थानला अंतिम सामन्यापर्यंतही पोहचवले होते. संजू सॅमसनचा हा तिसराच संघ आहे. त्याने २०१३ साली राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. तो पहिली तीन वर्षे या संघाकडून खेळल्यानंतर २०१६ आणि २०१७ दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता.

महत्वाचे ट्रेंड खालीलप्रमाणे

सॅम करन – इंग्लिश अष्टपैलू खेळाडू सीएसके वरून आरआर मध्ये बदली. २.४ कोटी शुल्क. मयंक मार्कडे केकेआर वरून एमआय मध्ये परतला (३० लाख). अर्जुन तेंडुलकर एमआयवरून एलएसजीमध्ये बदली (३० लाख). नीतीश राणा आरआरवरून डीसीमध्ये सामील (४.२ कोटी). डोनोवन फरेरा डीसीवरून आरआरमध्ये परतला (१ कोटी)

Web Title: Ipl 2026 retention franchises announce list of traded players marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2025 | 07:24 AM

Topics:  

  • IPL 2026
  • Mohammad Shami
  • Ravindra Jadeja
  • Sanju Samson

संबंधित बातम्या

IPL 2026 Retention Live Update : कधीकाळी बलात्काराचा आरोप, संघासाठी ‘स्टार’ कामगिरी! त्याच खेळाडूला RCB ने केले रिटेन
1

IPL 2026 Retention Live Update : कधीकाळी बलात्काराचा आरोप, संघासाठी ‘स्टार’ कामगिरी! त्याच खेळाडूला RCB ने केले रिटेन

IND vs SA : दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त! सर जाडेजाच्या जादुई फिरकी पुढे दक्षिण आफ्रिकेची दाणादाण; भारताची सामन्यावर पकड
2

IND vs SA : दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त! सर जाडेजाच्या जादुई फिरकी पुढे दक्षिण आफ्रिकेची दाणादाण; भारताची सामन्यावर पकड

IND vs SA 1st Test : रवींद्र जडेजाची अजून एक कमाल! कसोटी क्रिकेटमध्ये ‘हा’ कारनामा करणारा तो जगातील एकमेव फलंदाज…
3

IND vs SA 1st Test : रवींद्र जडेजाची अजून एक कमाल! कसोटी क्रिकेटमध्ये ‘हा’ कारनामा करणारा तो जगातील एकमेव फलंदाज…

CSK सोडल्यानंतर रवींद्र जडेजाची पहिली प्रतिक्रिया, राजस्थान रॉयल्सला आयपीएल ट्रॉफी जिंकवून देण्याचे दिले आश्वासन
4

CSK सोडल्यानंतर रवींद्र जडेजाची पहिली प्रतिक्रिया, राजस्थान रॉयल्सला आयपीएल ट्रॉफी जिंकवून देण्याचे दिले आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.