रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून त्यांची रिटेन्शन लिस्ट जाहीर(फोटो-सोशल मीडिया)
RCB retains Yash Dayal : आयपीएल २०२६ च्या आधी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून त्यांची रिटेन्शन लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. गेल्या हंगामातील विजेता आरसीबी यावेळी त्यांचे जेतेपद कायम राखण्याची तयारी करत असल्याचे दिसून येत आहे. फ्रँचायझीने एकूण आठ खेळाडूंना रिलीज केले असून अनेक प्रमुख खेळाडूंना रिटेन्शन दिले आहे. या यादीत गेल्या वर्षी वादात सापडेलल्या एका वेगवान गोलंदाजाचा देखील समावेश आहे. हो आम्ही यश दयालबाबत बोलत आहोत.
हेही वाचा : वैभव सूर्यवंशीच्या सिक्स हिटिंगचे गूढ काय? त्याचा सामना करायला गोलंदाज घाबरतात; वाचा सविस्तर
जून २०२५ मध्ये, गाझियाबादमधील एका तरुणीकडून वेगवान गोलंदाज यश दयालवर गंभीर आरोप लावण्यात आले होते. या तरुणीने दावा केला होता की लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी गैरवर्तन करण्यात आले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर, पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला आणि तक्रारीची चौकशी देखील सुरू केली. असे असूनही, आरसीबीने आगामी हंगामासाठी यश दयालवर विश्वास कायम ठेवत त्याला संघात राखले आहे. फ्रँचायझीचा निर्णय त्याच्या क्रिकेट कामगिरीवर आधारित असल्याचे बोलले जात आहे.
यश दयालने आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीसाठी शानदार कामगिरी बाजवली होती. १५ सामन्यांमध्ये त्याने १३ बळी घेतले. मागील हंगाम, २०२४, त्याच्यासाठी चांगला राहिला होता, त्याने १४ सामन्यांमध्ये १५ बळी टिपले होते. तो गेल्या दोन वर्षांपासून आरसीबीच्या गोलंदाजी युनिटचा महत्वाचा भाग आहे. २०२३ मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना, रिंकू सिंगने त्याला सलग पाच षटकार मारल्यानंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता.
हेही वाचा : Delhi blast : हाशिम अमलाचा ‘तो’ दावा ठरला खोटा! भारत असुरक्षित असल्याची पोस्ट झाली होती व्हायरल
आरसीबीकडून आपला मुख्य गट मजबूत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रजत पाटीदार, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल साल्ट, जितेश शर्मा, कृणाल पंड्या, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, जेकब बेथेल, जोश हेझलवूड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसिक सलाम, अभिनंदन सिंग, सुयश शर्मा.
आरसीबीने लिलावापूर्वी संघातील अनेक मोठ्या स्टार खेळाडूंना रिलीज केले आहे. मुक्त झालेल्या खेळाडूंमध्ये स्वस्तिक चिकारा, मयंक अग्रवाल, टिम सेफर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, मनोज भंडागे, लुंगी एनगिडी, ब्लेसिंग मुझाराबानी आणि मोहित राठी यांचा समावेश आहे.






