
IPL 2027 Auction
वृत्तानुसार, आयपीएल २०२७ चा (IPL 2027 Mini Auction) लिलाव डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. २०२८ मध्ये होणाऱ्या मुख्य लिलावापूर्वीचा हा शेवटचा मिनी-लिलाव असेल. आयपीएल २०२७ साठी खेळाडूंचा लिलाव ७ ते १३ डिसेंबर दरम्यान होईल. गेल्या तीन वर्षांपासून इंडियन प्रीमियर लीगचा लिलाव परदेशात आयोजित केला जात होता, पण यावेळी हा लिलाव भारतात होणार आहे.
काही दिवसांपूर्वी, आयपीएलचे अध्यक्ष अरुण सिंग धुमाळ यांनी घोषणा केली की, २०२७ चा इंडियन प्रीमियर लीग लिलाव भारतात आयोजित केला जाईल. तीन वर्षे परदेशात लिलाव आयोजित केल्यानंतर, बीसीसीआय हा कार्यक्रम भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहे. मागील तीन लिलाव दुबई, जेद्दाह आणि अबू धाबी या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. अरुण धुमाळ म्हणाले की, ‘दरवर्षी आम्ही लिलाव भारतात आयोजित करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, लग्नसराईमुळे आम्हाला जागा मिळत नाही. या वेळी, आम्हाला हा कार्यक्रम भारतात आयोजित करायचा आहे, कारण हा एक मिनी लिलाव आहे आणि आम्हाला जागा मिळेल अशी आशा आहे.’ असेही वृत्त आहे की,आयपीएलची २० वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी बीसीसीआयने ही स्पर्धा अधिक भव्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
महिला प्रीमियर लीग २०२७ च्या आधीच एक लिलाव होणार आहे. डब्ल्यूपीएलचा लिलाव २८ ऑक्टोबर रोजी होईल. सर्व पाच संघांना २८ सप्टेंबरपर्यंत त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करणे आवश्यक आहे, त्यानंतर खेळाडूंच्या लिलावाची तयारी सुरू होईल. महिला प्रीमियर लीगचा लिलाव कोची येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये आयोजित केला जाईल. महिला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२७ लक्षात घेता, डब्ल्यूपीएल थोडी लवकर संपेल. ही मोठी स्पर्धा १४ जानेवारी रोजी सुरू होणार असून, तिचा अंतिम सामना ७ फेब्रुवारी रोजी खेळला जाण्याची शक्यता आहे.
IND W vs BAN W: फायनलच्या तिकिटासाठी भारत-बांग्लादेश आमनेसामने; कधी, कुठे पाहाल LIVE सामना ?