
photo- social media
लखनौ सपर जायंट्स (Lucknow Super Giants) साठी हा हंगाम अत्यंत निराशाजनक ठरला. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली संघाने १४ पैकी केवळ चार सामने जिंकले आणि गुणतालिकेत तळाशी राहिला. फलंदाज म्हणूनही पंतची कामगिरी खराब झाली. संपूर्ण हंगामात त्याने फलंदाजीच्या क्रमात अनेक बदल केले. विशेषतः निकोलस पूरनला वरच्या क्रमावर पाठवण्याचा निर्णय अपयशी ठरला. सर्व सामने संपल्यानंतर पंतला टीकेला सामोरे जावे लागले. यानंतर त्याने स्वेच्छेने कर्णधारपदाचा राजीनामा दिला.
पाच ट्रॉफी जिंकून देणाऱ्या रोहित शर्मालाला हटवून मुंबई इंडियन्सने (MI) मोठ्या अपेक्षांसह हार्दिक पांड्याकडे संघाचे नेतृत्व सोपवले होते. कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच हंगामात त्याने गुजरात टायटन्सला विजय मिळवून दिला आणि दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचवले. मात्र, मुंबई इंडियन्ससाठी कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. काही वरिष्ठ खेळाडूंनी प्रशिक्षकांच्या रणनीतीचे पालन केले नसल्याच्या बातम्यांमुळे संघात मतभेद असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे पुढील हंगामापूर्वी हार्दिकला कर्णधारपदावरून हटवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच त्याला संघातून रिलीजही केले जाऊ शकते.
दिल्ली कॅपिट्लसने संघाची धुरा अक्षर पटेलच्या हाती सोपवली. पण त्याचे कर्णधारपद प्रभावी ठरले नाही. दिल्ली कॅपिटल्स शेवटपर्यंत प्लेऑफच्या शर्यतीत टिकून असली तरी, हे समीकरण अवघड होते. दिल्लीने १४ पैकी ७ सामने जिंकले असले तरी प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले. अक्षरची गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही निराशाजनक राहिली. त्याने १३ सामन्यांत फक्त ११ विकेट घेतल्या. त्यामुळे पुढील हंगामात दिल्ली नवीन कर्णधाराचा विचार करू शकते.
कोलकाता नाइट रायडर्सने श्रेयस अय्यरच्या जागी अजिंक्य रहाणेला कर्णधार केले. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली संघाला अपेक्षित यश मिळाले नाही. केकेआरने यंदा गुणतालिकेत सातवे स्थान मिळवले. ३७ वर्षीय रहाणेने १४ सामन्यांत ३३५ धावा केल्या, पण संघ पुढील हंगामापूर्वी ३७ वर्षीय रहाणेला कर्णधारपदावरून हटवू शकतो किंवा त्याला रिलीजही करू शकतो.
RCB: ‘Ee Sala Nu Cup Namde’ विजयानंतर RCB ने अचानक घेतला मोठा निर्णय; लाखो चाहते नाराज