Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2027 पूर्वी पंजाब किंग्समध्ये मोठी खळबळ! ‘या’ दोन दिग्गजांनी सोडली साथ; पाँटिंगसमोर मोठं आव्हान

James Hopes Brad Haddin Resigned punjab Kings Coaching staff: आयपीएल २०२७ ची तयारी आधीच सुरू झाली आहे. मात्र, त्याआधी पंजाब किंग्सला मोठा धक्का बसला आहे. फ्रँचायझीचे दोन दिग्गजांनी संघाची साथ सोडली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 08, 2026 | 01:57 PM
James Hopes Brad Haddin Resigned

James Hopes Brad Haddin Resigned

Follow Us
Follow Us:
  • पंजाब किंग्समध्ये मोठा ट्विस्ट
  • दोन दिग्गज प्रशिक्षकांचा राजीनामा
  • पाँटिंगला मोठा धक्का

Punjab Kings: आयपीएल २०२७ (IPL 2027) ची तयारी सुरू झाली आहे. त्याआधी प्रत्येक फ्रँचायझीमध्ये मोठे बदल होत आहेत. सध्या पंजाब किंग्स संघातूनही एक मोठी बातमी समोर येत आहे. पंजाब किंग्सच्या कोचिंग स्टाफमध्ये सतत बदल होत आहेत. साईराज बहुतुलेने नुकताच पंजाबला निरोप दिला होता. आता आणखी दोन दिग्गज खेळाडूंनी फ्रँचायझी सोडली आहे. त्यामुळे पंजाबच्या कोचिंग स्टाफमध्ये फक्त रिकि पाँटिंगच उरले आहे.’

Ishan Kishanचा धुमाकूळ! विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला; एका वर्षात सर्वाधिक T20 धावा

जेम्स होप्स आणि ब्रॅड हॅडिनने दिला राजीनामा

फिल्डिंग प्रशिक्षक ब्रॅड हॅडिन आणि वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक जेम्स होप्स यांनी पंजाब किंग्स संघ सोडला आहे. होप्स आणि रिकी पाँटिंग यांनी एकत्र मोठ्या प्रमाणावर काम केले असून ते दिल्ली कॅपिटल्स संघाचाही भाग होते. दुसरीकडे, हॅडिन काही वर्षांपूर्वी पंजाब किंग्समध्ये सामील झाले होते. आता, त्या दोघांनीही संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. वृत्तानुसार, ब्रॅड हॅडिन आणि जेम्स होप्स यांनी अलीकडेच फ्रँचायझीला संघ सोडण्याबद्दल कळवले आहे. पंजाबला आता पुढील वर्षीच्या आयपीएलपूर्वी तीन नवीन प्रशिक्षक शोधावे लागतील.

बिग बॅश लीगमध्ये मिळणार जबाबदारी?

मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्यावर आता एक मोठी जबाबदारी आली आहे. नवीन सपोर्ट स्टाफची निवड करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रँचायझी पाँटिंग यांच्या संपर्कात असून संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा सुरू आहे. व्यवस्थापन काही नावे सुचवू शकते, पण अंतिम निर्णय पाँटिंग यांचाच असेल. वृत्तानुसार, पंजाब डिसेंबरपूर्वी आपल्या नवीन प्रशिक्षकांची नावे जाहीर करू शकते. हॅडिन आणि जेम्स होप्स यांची नजर आता बीबीएलवर आहे. वृत्तानुसार, या दोघांनाही बिग बॅश लीगमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.

स्पिन कोचनेही राजीनामा दिला

आयपीएल २०२६ नंतर पंजाबला मोठा धक्का बसला. फिरकी प्रशिक्षक साईराज बहुतुले यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भारतीय संघाच्या फिरकी गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारली. बहुतुले २०२६ च्या आयपीएल पूर्वी पंजाबमध्ये सामील झाले होते. सुनील जोशींच्या जाण्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, पुढील वर्षीच्या आयपीएलपूर्वी पंजाबमध्ये मोठे बदल होऊ शकतात. फ्रँचायझी कोणत्या तीन अनुभवी खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून संघात सामील करते, हे पाहणे बाकी आहे.

IND Vs WI 2nd T20: भारत-वेस्ट इंडिजचा दुसरा T20 सामना पावसात वाहून जाणार? रांचीत हवामान करणार गेम

Web Title: Ipl 2027 punjab kings james hopes brad haddin resigned ricky ponting pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 01:57 PM

Topics:  

  • IPL 2027
  • Preity Zinta
  • Punjab Kings
  • Ricky Ponting

संबंधित बातम्या

IPL 2027: सौरव गांगुली हेड कोच, दिल्ली कॅपिटल जिंकणार? कर्णधारही बदलणार असल्याचे संकेत
1

IPL 2027: सौरव गांगुली हेड कोच, दिल्ली कॅपिटल जिंकणार? कर्णधारही बदलणार असल्याचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.