फोटो सौजन्य - LahoreQulandars सोशल मीडिया
PSL – IPL : एकीकडे आयपीएल २०२५ चा १८ वा सीझनमध्ये अनेक धमाकेदार मनोरंजक सामने पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे शेजारील देशामध्ये पाकिस्तानमध्ये लीग सुरु आहे. बऱ्याचदा पाकिस्तानी चाहते आणि भारतीय क्रिकेट चाहते त्यांच्यामध्ये आयपीएल आणि पीएसएल यांच्यामध्ये तुलना करत असतात. आयपीएलमध्ये मोठी प्रमाणात बक्षीस रक्कम त्याचबरोबर खेळाडूंना लिलावामध्ये बीसीसीआय पैसे देत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परदेशी खेळाडू सुद्धा आयपीएलचा भाग आहेत. आता इंग्लंडचा यष्टीरक्षक-फलंदाज सॅम बिलिंग्जने आयपीएल आणि पीएसएल यांच्यामध्ये तुलना करणाऱ्याना सडेतोड उत्तर दिले आहे.
इंग्लंडचा यष्टीरक्षक-फलंदाज सॅम बिलिंग्जने आयपीएल आणि पीएसएलमधील आपली पसंती उघड करून पाकिस्तानी माध्यमांना चकित केले. बिलिंग्जने आयपीएलला पीएसएलपेक्षा चांगले म्हटले. सॅम बिलिंग्ज सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर्सचे प्रतिनिधित्व करत आहे. पत्रकार परिषदेदरम्यान, बिलिंग्जला एका पाकिस्तानी पत्रकाराने विचारले की, आयपीएल किंवा पीएसएल यापैकी तुम्हाला कोणते चांगले वाटते? बिलिंग्जने पत्रकारावर टीका केली आणि म्हटले की त्याला काहीतरी विचित्र बोलायचे आहे.
तुला मी काहीतरी मूर्ख बोलू इच्छितो का? जगातील कोणत्याही लीगला आयपीएलपेक्षा जास्त प्रसिद्ध मानणे कठीण आहे. इतर सर्व स्पर्धा आयपीएलच्या मागे आहेत. तुम्हाला माहिती आहेच की इंग्लंडमध्ये आम्ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम स्पर्धा बनण्यासाठी PSL सारखे करण्याचा प्रयत्न करतो. बिग बॅश लीग देखील असेच करण्याचा प्रयत्न करत आहे.
Sam Billings gives a fitting reply to a reporter who asked him to compare the PSL with the IPL 😬🗣️🏏#IPL2025 #PSL2025 #SamBillings #Sportskeeda pic.twitter.com/CKLcwDyqyB
— Sportskeeda (@Sportskeeda) April 16, 2025
सध्याच्या पीएसएलमध्ये सॅम बिलिंग्जची कामगिरी आतापर्यंत संमिश्र राहिली आहे. या इंग्लिश फलंदाजाने लाहोर कलंदर्ससाठी तीन सामन्यांमध्ये ६९ धावा केल्या, ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. तो एकदा खाते न उघडताच बाद झाला होता. पाकिस्तानी पत्रकाराने भारताचा उल्लेख करून काही मसाला निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलीकडेच, एका पाकिस्तानी पत्रकाराने कराची किंग्जचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला विचारले की पीएसएलमध्ये खेळल्याबद्दल भारतीय चाहत्यांकडून मिळणाऱ्या द्वेषाबद्दल तो काय म्हणेल. आयपीएलमध्ये वॉर्नरला खरेदीदार मिळाला नाही. कांगारू खेळाडूने प्रत्युत्तर देत म्हटले की त्याने पहिल्यांदाच असे ऐकले आहे.
हिंदुस्तान टाईम्सने वॉर्नरला उद्धृत करत म्हटले आहे की, ‘मी पहिल्यांदाच असे ऐकले आहे. माझ्या दृष्टिकोनातून, मला क्रिकेट खेळायचे आहे. इथे मला पीएसएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. माझ्या आंतरराष्ट्रीय कॅलेंडरने वेळेअभावी मला पीएसएलमध्ये येऊ दिले नाही. मला आता स्पर्धा करायची आहे. मी कराची किंग्जचे नेतृत्व करत आहे आणि आम्हाला आशा आहे की आम्ही ट्रॉफी जिंकू.