
फोटो सौजन्य - JioHostar
Virat Kohli and Gautam Gambhir Video : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली या मालिकेमध्ये भारताच्या संघाने शेवटच्या सामन्यामध्ये विजय मिळवून मालिका नावावर केली आहे. आता भारताचा संघ हा टी20 मालिका खेळताना दिसणार आहे, या मालिकेमध्ये पाच सामने खेळवले जाणार आहेत. या संघाचे कर्णधारपद हे सुर्यकुमार यादवकडे असणार आहे.
कालच्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने 9 विकेटने सामना जिंकला यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि यशस्वी जयस्वाल यांचे दमदार कामगिरी पाहायला मिळाली. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना विशाखापट्टणम येथे खेळवण्यात आला. टीम इंडियाने हा सामना जिंकून मालिका २-१ अशी जिंकली. सुपरस्टार विराट कोहलीने चौकार मारून विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर, सामना झाल्यानंतर सर्व खेळाडू हस्तांदोलन करताना दिसले.
त्याच वेळी, विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर देखील समोरासमोर आले. दोघांनी हॅन्डशेक केला पण एकमेकांकडे पाहिले देखील नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहते प्रश्न विचारत आहेत की दोघांमध्ये सर्व काही ठीक नाही का?
विशाखापट्टणम वनडे जिंकल्यानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि विराट कोहली हसत हसत हस्तांदोलन करताना दिसले. त्यांनी एकमेकांशी नजरही फिरवली नाही. विजयानंतर कोहली इतर सर्व खेळाडूंना मिठी मारताना दिसला, पण त्याने गंभीरसोबत असे केले नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
Gambhir raagane Kohli 😭😭😂#ViratKohli pic.twitter.com/RyQUefetCZ — RepAtiKosAAmᴿᴱᴮᴱᴸᵂᴼᴼᴰ (@prabhasish143) December 6, 2025
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील संपूर्ण मालिकेत असेच दृश्य पाहायला मिळाले आहे. रांची वनडेनंतरही सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. विराट कोहली गंभीरजवळून जात असताना त्याने अचानक त्याचा फोन बाहेर काढला आणि काम करू लागला. त्यावेळी गंभीर त्याच्याकडे पाहत होता. रांची वनडे जिंकल्यानंतर, जेव्हा संघ विजयाचा केक कापत होता, तेव्हा कोहलीने मुख्य प्रशिक्षकाचाही अपमान केला आणि पुढे गेला. या मालिकेतील हा तिसरा व्हिडिओ आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.