IPL 2025 : इशान किशनने सनरायझर्स हैदराबादकडून सराव सामना खेळत तूफान फटकेबाजी केली आहे. जो सामना इंट्रा स्क्वॉड खेळला गेला. इशान किशनने या सामन्यात एकूण 58 चेंडूत 137 धावा केल्या आहेत. एसआरएच संघाने हा सामना दोन भागात विभागून खेळला आहे. आपल्या स्फोटक फलंदाजीने त्याने सनरायझर्स हैदराबादच्या व्यवस्थापन आणि काव्या मारनला मोठा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आता जर हा संदेश ठीक निशाण्यावर बसला तर नरायझर्स हैदराबाद ईशान किशनला टीम इंडियात पुनरागमन करायला मदत करू शकते. असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
सनरायझर्स हैदराबादच्या इंट्रा स्क्वॉडच्या सामन्याची विशेष गोष्ट म्हणजे इशान किशनला टीम ए आणि टीम बी दोन्हीकडून बॅटिंग करण्याची संधी मिळाली आहे. आणि, इशान किशनने याचा पुरेपूर फायदा घेत सामन्यात एकूण 137 धावा चोपल्या आहेत.
हेही वाचा : IML Final 2025 : आयएमएल फायनलचा आज रंगणार थरार: जाणून घ्या संघापासून ते ठिकाणापर्यंत संपूर्ण माहिती…
प्रथम फलंदाजी करताना अ संघाने 260 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात 261 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ब टीमने 200 धावापर्यंत मजल मारता आली. पण मात्र, लक्ष्याला ते गाठू शकले नाहीत. दोन्ही संघांकडून खेळताना इशान किशनने आपला स्फोटक अंदाज दाखवताना महत्त्वाची खेळी केली. त्याने टीम ए साठी प्रथम फलंदाजी केली आणि त्याने 28 चेंडूत 64 धावा करून तो बाद झाला. त्यानंतर तो टीम बीकडून खेळायला मैदानात उतरला आणि त्याने 30 चेंडूत 73 धावांची स्फोटक खेळी करून निवृत्ती स्वीकारली. ईशान किशनने सलामीवीर म्हणून या दोन्ही डावात फलंदाजी केली. त्याने दोन्ही डावात मिळून 58 चेंडूत 137 धावा केल्या आहेत.
सनरायझर्स हैदराबादच्या पहिल्या इंट्रा स्क्वॉड सराव सामन्यात इशान किशनने आपल्या धडाखेबाज फलंदाजीने सर्वांना धक्का दिला आहे. तसेच या खेळीने त्याने एकप्रकारे संघ व्यवस्थापन आणि फ्रेंचायझी मालक काव्या मारन यांना मोठा संदेशच दिल्याचे म्हटले जाता आहे. सनरायझर्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी त्याने या खेळीने दावा ठोकला असल्याचा एक संदेश आहे.
हेही वाचा : Virat Kohli : किंग कोहलीची बीसीसीआयविरोधात ‘विराट’ डरकाळी; खेळाडूंसाठीचे नियम चुकीचे, आवाज उठवणार..
इशान किशन ज्या पद्धतीने फलंदाजी करताना दिसून आला. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद आर्मीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचे स्थान निश्चित असल्याचे मानले जात आहे आणि जर असे घडले तर सनरायझर्स हैदराबादच्या या निर्णयाद्वारे, इशान किशन तो केवळ आयपीएल 2025 मध्ये फलंदाजीचा जलवा दाखवणार नाही तर टीम इंडियामध्ये देखील त्याला पुनरागमनाची संधी मिळण्याची शक्यताअ आहे.