IND vs ENG: 'Leading the team is difficult for Shubman Gill, he should be patient..', advises former head coach Ravi Shastri
IND vs ENG : भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा असा विश्वास आहे की, भारताचा नवा कसोटी कर्णधार शुभमन गिलसाठी इंग्लंडमध्ये कसोटी संघाचे नेतृत्व करणे सोपे नसेल आणि यशासाठी त्याला संयमाने काम करावे लागेल. विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर. अश्विन यांच्या निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेट बदलाच्या टप्प्यातून जात आहे. अशा वेळी, बीसीसीआयने भारतीय कसोटी संघाची कमान गिलकडे सोपवली आहे. भारतीय संघाने आजपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरवात केली आहे.
शास्त्री यांनी ‘आयसीसी रिव्ह्यू’ मध्ये म्हटले आहे की, मला वाटते की त्याला वेळ द्यावा लागेल.” ते म्हणाले, “ते सोपे नसेल. त्याला एक कठीण काम देण्यात आले आहे. त्याला इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व करावे लागेल. गिलने आतापर्यंत ३२ कसोटी सामने खेळले आहेत आणि ३५.०५ च्या सरासरीने १८९३ धावा केल्या आहेत. भारतीय संघाने २००७मध्ये इंग्लंडमध्ये शेवटची कसोटी मालिका जिंकली होती. इंग्लंडचा दौरा गिलसाठी शिकण्याची चांगली संधी असू शकतो असे शास्त्री मानतात. तो आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे. हे सोपे नाही पण मला वाटते की तो खूप काही शिकेल.
हेही वाचा : CPL 2025 : चेन्नई सुपर किंग्सचा स्टार झाला नाईट रायडर्समध्ये सामील! सांभाळणार महत्त्वाची जबाबदारी
भारतीय संघाचा नवा कसोटी कर्णधार शुभमन गिलचे समर्थन करीत तो इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करण्यास सज्ज असल्याचे मत भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी वर्तविले. गिलच्या नेतृत्वाखालील आयपीएल संघ गुजरात टायटन्सचे मार्गदर्शक असलेले कर्स्टन यांचा असा विश्वास आहे की गिलमध्ये एक चांगला नेता बनण्यासाठी सर्व गुण आहेत.
मला वाटते की शुभमन एक उत्तम कर्णधार ठरेल. तो एक हुशार क्रिकेटपटू आहे. त्याला खेळाबद्दल चांगली बुद्धी आहे आणि तो त्याचा खेळ समजतो. तो खूप प्रतिभावान आणि चांगला माणूस आहे, जे मला खूप महत्वाचे वाटते. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज म्हणाला, शुभमनबद्दल मला सर्वात जास्त आवडणारी एक गोष्ट म्हणजे तो जे बोलतो ते करतो. तो खूप मेहनती आहे आणि हे इतर खेळाडूंसाठी एक उत्तम उदाहरण आहे. मला वाटते की तो आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवण्यास तयार आहे.
हेही वाचा : IND vs ENG : ब्रिटिशांनी जिंकला टॉस, प्रथम गोलंदाजीचा निर्णय; भारतीय फलंदाजांची लागणार कसोटी…
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक/उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बूमराह.