बेन स्टोक आणि शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरवात होत आहे. ही मालिका येथून पुढे अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी या नावाने ओळखली जाणार आहे. हेडिंग्ले, लीड्स येथे हा सामना खेळवण्यात येत आहे. इंग्लंडचा कप्तान बेन स्टोकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊन भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले आहे. भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल सलामीला येणार आहेत.
विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन भारतीय दिग्गजांनी निवृत्ती घोषित केली आहे. त्यामुळे आता शुभमन गिलच्या खांद्यावर भारतीय संघाची धुरा सोपविण्यात आली आहे. तसेच भारतीय संघात युवा खेळाडूंचा भरणा आहे. यामुळे इंग्लिश भूमीवर भारतीय संघाला मोठा संघर्ष करावा लागणार आहे. तुलनेत बेन स्टोकच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ मात्र अनुभवी आणि वरिष्ठ दिसून येत आहे. इंग्लंडकडे जो रूट सारखा दिग्गज फलंदाज आहे. तसेच ख्रिस वोक्ससारखा अनुभवी गोलंदाज आहे. त्यामुळे भारताला विजयासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.
टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक गौतम गंभीर इंग्लंडच्या खेळपट्ट्या आणि परिस्थिती चांगल्या प्रकारे जाणून आहे. एक खेळाडू म्हणून, त्याने येथे अनेक सामने देखील खेळले आहेत आणि त्याचा अनुभव रणनीती ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. वेगवान स्विंग आणि सीम हालचालींना तोंड देण्यासाठी गंभीरने खेळाडूंना विशेष अभ्यास करून घेतला आहे.
पहिली कसोटी २० जून ते २४ जून, हेडिंग्ले लीड्स
दुसरी कसोटी २ जुलै ते ६ जुलै, एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
तिसरी कसोटी १० जुलै ते १४ जुलै, लॉर्ड्स, लंडन
चौथी कसोटी २३ जुलै ते २७ जुलै, ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
पाचवी कसोटी ३१ जुलै ते ४ ऑगस्ट, द ओव्हर, लंडन
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.
हेही वाचा : ‘मी महिला क्रिकेटमध्ये…’,अनाया बांगरच्या पोस्टने उडवली खळबळ! वेधले ICC आणि BCCI चे लक्ष, Video Viral
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक/उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बूमराह.