फोटो सौजन्य – X
इटली विरुद्ध स्कॉटलंड : इटलीला २०२६ च्या टी२० विश्वचषकाचे तिकीट मिळू शकते. हो… तुम्ही बरोबर वाचले आहे. फुटबॉल आणि टेनिससाठी प्रसिद्ध असलेला हा देश हळूहळू क्रिकेटच्या जगातही आपले नाव कमावत आहे. युरोप रीजनल फायनल क्वालिफायरमध्ये स्कॉटलंडला हरवल्यानंतर पुढील वर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषकात खेळण्याची इटलीची आशा निर्माण झाली. तुम्हाला सांगतो की, २०२६ मध्ये भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या टी२० विश्वचषकात एकूण २० संघ सहभागी होतील.
आतापर्यंत १३ संघांनी या मेगा आयसीसी स्पर्धेसाठी तिकिटे मिळवली आहेत, ७ स्थानांसाठीची शर्यत अजूनही सुरू आहे. माजी ऑस्ट्रेलियन फलंदाज जो बर्न्सच्या नेतृत्वाखालील इटलीच्या विजयामुळे, शुक्रवारी, ११ जुलै रोजी नेदरलँड्सच्या आव्हानावर मात करता आली तर ते आयसीसी स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या आठवड्यात ५ जुलै रोजी युरोपियन पात्रता फेरी सुरू झाली तेव्हा पुढील टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरण्यासाठी पाच संघ स्पर्धात होते.
IND vs ENG : बुमराह की आर्चर? लॉर्ड्सवर कोण वर्चस्व गाजवेल? जाणून घ्या हेड-टू-हेड
गेल्या दोन दिवसांत, ग्वेर्नसी हा एकमेव संघ बाहेर पडला आहे, तर नेदरलँड्स, इटली, स्कॉटलंड आणि जर्सी यांच्यात कठीण स्पर्धा आहे. शुक्रवारी सिंगल राउंड-रॉबिन स्टेजच्या शेवटी, अव्वल दोन संघ विश्वचषकासाठी पात्र ठरतील. अनेक मनोरंजक निकाल आणि पावसामुळे दोन सामने रद्द झाल्यामुळे, इटली विश्वचषकात स्थान मिळविण्यासाठी मजबूत स्थितीत आहे.
तथापि, शेवटच्या दिवशी त्यांचा सामना नेदरलँड्सशी होईल, तर जर्सीचा सामना स्कॉटलंडशी होईल. इटली सध्या ३ सामन्यांतून ५ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे, तर नेदरलँड्सचे ४ गुण आहेत, तर जर्सी आणि स्कॉटलंडचे प्रत्येकी ३ गुण आहेत.
🚨 ITALY CREATE HISTORY by beating Scotland! 🔥
And right now, they top the #T20WorldCup Europe Qualifier table 🔝
Emilio Gay’s 50(21), Grant Stewart’s 44*(27), and a tremendous 5-wicket haul from Harry Manenti gets the better of a full-strength Scotland team! 💥
Italy – the… pic.twitter.com/IVOjgUCmOZ
— Cricketangon (@cricketangon) July 9, 2025
जर इटलीने नेदरलँड्सविरुद्धचा शेवटचा सामना जिंकला तर त्यांना २०२५ च्या टी२० विश्वचषकाचे तिकीट निश्चितच मिळेल, तर जर संघ हरला तर मुद्दा नेट रन रेटवर अडकेल. जर्सी आणि स्कॉटलंड यांच्यात जिंकणारा संघ ५ गुणांपर्यंत पोहोचेल, अशा परिस्थितीत, इटली आणि जर्सी विरुद्ध स्कॉटलंड सामना जिंकणाऱ्या संघांपैकी चांगला नेट रन रेट असलेल्या संघाला नेदरलँड्ससह टी२० विश्वचषकाचे तिकीट मिळेल.
भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, यूएसए, वेस्ट इंडीज, न्यूझीलंड, आयर्लंड, पाकिस्तान हे संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. अजुनही या स्पर्धेची क्वालिफायर सामने खेळवले जात आहेत.