
Jeremy Lalrinnunga : अशी नशिबानं थट्टा मांडली; दुखापतीने रोखली भारताच्या गोल्डन बॉयची भरारी!
भारतीय वेटलिफ्टिंगमध्ये आपल्या कामगिरीने नवी आशा निर्माण करणारा जेरेमी लालरिनुंगा (Jeremy Lalrinnunga) सध्या दुखापतींमुळे कारकिर्दीतील कठीण टप्प्यातून जात आहे. अवघ्या 19व्या वर्षी 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून त्याने देशाचे नाव उज्ज्वल केले होते. मात्र, वारंवार झालेल्या दुखापतींमुळे त्याच्या कारकिर्दीच्या प्रगतीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
एकेकाळी भारतीय वेटलिफ्टिंगचे भविष्यातील मोठे नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेरेमीकडून आता पुन्हा दमदार पुनरागमनाची अपेक्षा करण्यात येत आहे.
जेरेमी लालरिनुंगाचा जन्म 26 ऑक्टोबर 2002 रोजी मिझोराममधील ऐझॉल येथे झाला. त्याचे वडील नामांकित बॉक्सर होते. मात्र, आर्थिक अडचणींमुळे त्यांना या क्षेत्रात अपेक्षित प्रगती करता आली नाही. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत जेरेमीलाही सुरुवातीला बॉक्सिंगमध्ये करिअर करायचे होते. मात्र, मित्रांना वेटलिफ्टिंगचा सराव करताना पाहून त्याची या खेळात रुची निर्माण झाली. त्यानंतर त्याने वेटलिफ्टिंगमध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला. या प्रवासात त्याला वडिलांची साथ मिळाली.
जेरेमीने आर्मी स्पोर्ट्सच्या निवड चाचणीत यश मिळवले. त्यानंतर प्रशिक्षणासाठी तो पुण्यात दाखल झाला. कमी वयातच त्याने आपल्या गुणवत्तेची छाप पाडण्यास सुरुवात केली.
IND vs NZ : टीम इंडिया मालिका जिंकण्यासाठी सज्ज! भारत-न्यूझीलंड तिसरा T20 सामना कधी अन् कुठे?
जेरेमीने वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी 2016 च्या ज्युनियर वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये 56 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकून सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर आशियाई ज्युनियर स्पर्धेतही रौप्यपदक पटकावत त्याने राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात स्थान मिळवले.
2017 मध्ये त्याने कॉमनवेल्थ यूथ आणि ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर 2018 मध्ये ब्युनोस आयर्स येथे झालेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय वेटलिफ्टर ठरला. या यशामुळे भारतीय क्रीडा क्षेत्रात त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या.
जेरेमीच्या कारकिर्दीत दुखापतींचे आव्हानही वारंवार समोर आले. कोरोना काळात त्याला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. 2021 मध्ये गुडघ्याच्या मागील बाजूला झालेली गाठ काढण्यासाठी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्याने हार मानली नाही. डिसेंबर 2021 मध्ये कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून त्याने दमदार पुनरागमन केले.
फेब्रुवारी 2022 मध्ये प्रशिक्षणादरम्यान त्याच्या मणक्याला दुखापत झाली. या दुखापतीनंतरही त्याने जिद्द सोडली नाही. बर्मिंगहॅम येथे झालेल्या 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आणि वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी 67 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले.
Abu Dhabi T-10 मध्ये असणार वेस्ट इंडिज खेळाडूंचा जलवा, ‘हे’ बॅट्समन बॉलर्सचा घाम गाळणार
राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकानंतर जेरेमीची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. भविष्यात ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतही तो भारतासाठी पदक जिंकेल, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली. मात्र, गेल्या काही वर्षांतील दुखापतींनी त्याच्या कारकिर्दीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
यापूर्वीही अनेकदा दुखापतींवर मात करून जेरेमीने पुनरागमन केले आहे. त्यामुळे त्याच्या जिद्दीवर चाहत्यांचा विश्वास कायम आहे. आता पुन्हा एकदा दुखापतींवर मात करून हा युवा वेटलिफ्टर दमदार पुनरागमन करणार का, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
Ans: जेरेमी लालरिनुंगा हा भारताचा आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर असून त्याने युवा ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली आहेत.
Ans: त्याने बर्मिंगहॅम येथे झालेल्या 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 67 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले.
Ans: दुखापतींवर मात करून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पुन्हा दमदार कामगिरी करावी आणि भविष्यात ऑलिम्पिक पदकासाठी भारताचे आव्हान मजबूत करावे, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.