IND vs NZ 3rd T20 schedule
आता तिसऱ्या टी२० साठी दोन्ही संघ सज्ज आहेत. भारत हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल. तर, न्यूझीलंड सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या आशा जिवंत ठेवेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी२० सामना कधी, कुठे आणि केव्हा खेळला जाणार, जाणून घेऊयात.
थाला पुन्हा मैदानात उतरणार? IPL 2027 मध्ये खेळण्याबाबत MS Dhoni ने सोडले मौन; दिले मोठे संकेत
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी२० सामना मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. मालिकेतील पहिले दोन टी२० सामने क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हलवर खेळले गेले. आता तिसरा सामना वेलिंग्टनमधील हेन्री स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघांना तयारीसाठी अंदाजे दोन दिवसांचा कालावधी आहे. यावेळी न्यूझीलंड नक्कीच पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. जर न्यूझीलंड तिसरा सामनाही हरला, तर न्यूझीलंड ही मालिका गमावेल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी२० सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२:३० वाजता सुरू होईल. न्यूझीलंडच्या स्थानिक वेळेनुसार सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८:०० वाजता सुरू होईल.चाहते हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनल्सवर पाहू शकतात. तसेच, हा सामना डीडी स्पोर्ट्स चॅनलवरही लाइव्ह प्रसारित केला जाईल.
पहिले दोन टी-२० सामने गमावल्यानंतर न्यूझीलंडने आपल्या संघात बदल केले आहेत. तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन संघात नसेल. मॅट हेन्रीलाही विश्रांती देण्यात आली असून तो आता थेट एकदिवसीय मालिकेत खेळेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना ४ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. काईल जेमिसन तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी संघात असेल, परंतु त्याला चौथ्या आणि पाचव्या टी-२० सामन्यांमधून वगळण्यात आले आहे. ब्लेअर टिकनरचाही संघात समावेश करण्यात आला असून तो पुढील तीन सामन्यांसाठी संघासोबत राहील. याशिवाय, जोश क्लार्कसन चौथ्या आणि पाचव्या टी-२० सामन्यांसाठी संघात सामील होईल.
Ans: तिसरा T20 सामना २७ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे.
Ans: भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना दुपारी १२:३० वाजता सुरू होणार आहे.
Ans: हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आणि डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल.






