6 batsmen LBW in Duleep Trophy..! Jharkhand's Manishi creates history on debut! Becomes the first Indian player to achieve such feat
Manishi creates history in Duleep Trophy 2025 : दुलीप ट्रॉफी २०२५ च्या क्वार्टर फायनलमध्ये पूर्व विभागाकडून खेळणाऱ्या झारखंडच्या फिरकीपटू मनीषीने पदर्पणात प्रभावी कामगिरी केली आहे. पदार्पणाच्या सामन्यात त्याने ६ बळी घेऊन मनीषीने विश्वविक्रमाची बरोबरी साधली आहे. मनीषीची पहिल्यांदाच दुलीप ट्रॉफीसाठी निवड करण्यात आली आहे. मनीषीने आपल्या कामगिरीने उत्तर विभागाविरुद्ध आपला संघ पूर्व विभागाच्या सामन्यातील आशा जिवंत ठेवल्या आहेत.
दुलीप ट्रॉफीमध्ये पूर्व विभागाकडून खेळताना मनीषीने २२.२ षटकांत १११ धावा मोजत ६ बळी टिपले आहेत. यासह त्याने एक अनोखा विक्रम देखील आपल्या नावावर नोंदवला आहे. डावखुरा फिरकीपटू मनीषीने एका डावात ६ फलंदाजांना एलबीडब्ल्यू बाद करून माघारी पाठवले आहे. यासह त्याने विश्वविक्रमाची बरोबरी देखील साधली.
हेही वाचा : ICC Women’s World Cup मध्ये विजेत्यासह ‘हे’ संघही होणार मालामाल! होणार कोट्यवधी रुपयांचा वर्षाव..
२१ वर्षीय मनीषी हा प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात ६ एलबीडब्ल्यू विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे. त्याचबरोबर, जागतिक क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा मनीषी हा जगातील सहावा गोलंदाज ठरला आहे. मनीषीने शुभम खजुरिया (२६), अंकित कुमार (३०), यश धुल (३९), कन्हैया वाधवान (७६), नबी (४४) आणि हर्षित राणा (७) यांना एलबीडब्ल्यू बाद करून माघारी पाठवले. यासह त्याने विश्वविक्रमाशी बरोबरी साधली.
यापूर्वी, पाच गोलंदाजांकडून त्यांच्या कारकिर्दीत हा अनोखा विक्रम करण्यात आला आहे आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च स्तरावर त्यांच्या देशांचे प्रतिनिधित्व केले आहे. ज्यामध्ये इंग्लंडचा ऑली रॉबिन्सन (२०२१) आणि मार्क इलोट (१९९५), श्रीलंकेचा चामिंडा वास (२००५) आणि पाकिस्तानचा तबीश खान (२०११) यांचा समावेश आहे.
हेही वाचा : T20 आशिया कपमध्ये कोण आहे सर्वोत्तम सरासरीचा किंग! जाणून घ्या ‘या’ 6 फलंदाजांची आकडेवारी
मनीषीचा जन्म जमशेदपूरमध्ये झाला आहे. तो डावखुरा फिरकी गोलंदाज असून त्याने फार कमी वेळात त्याच्या चमकदार कामगिरीने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आणि पूर्व विभागाच्या संघात स्थान निश्चित केले. मागील तीन वर्षांमध्ये मनीषीने फक्त ९ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, यामध्ये त्याने नहेमीच संघासाठी महत्त्वाची भूमिका वठवली आहे. मागील रणजी ट्रॉफी हंगामात त्याने २७.२२ च्या सरासरीने २२ गडी घेतले होते.
दुलीप ट्रॉफीमध्ये पूर्व विभागाकडू खेळताना मनिषीने त्याच्या पहिल्याच सामन्यात सहा फलंदाजांना बाद केले आहेत. हा त्याची पाच विकेट्स घेण्याची पहिलीच वेळ ठरली आहे. यापूर्वी त्याने तमिळनाडूविरुद्ध ९९ धावांच्या बदल्यात ४ विकेट्स घेतल्या होत्या.