फोटो सौजन्य - X
जसप्रीत बुमराह : टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध आज पहिला कसोटी सामना खेळणार आहे यामध्ये भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बॉर्डर गावास्कर ट्रॉफीमध्ये झालेल्या दुखापतीनंतर पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळताना दिसणार आहे. दुखापतीमुळे चॅम्पियन ट्रॉफी मध्ये देखील तो खेळू शकला नव्हता. आज त्याच्या कामगिरीवर विशेष लक्ष असणार आहे त्याचबरोबर त्यासह मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा यांना देखील संघामध्ये स्थान मिळाले आहे. भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलच्या आपला पहिला सामना खेळताना दिसणार आहेत.
दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे भारतीय संघासाठी इंग्लंडचे मोठ्या आव्हान असणार आहे कारण की युवा खेळाडू हे आज मैदानात उतरतील. पहिली कसोटी लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळली जाईल. विराट कोहली आणि रोहित शर्माशिवाय भारतीय फलंदाजी अनुभवाची कमतरता भासू शकते, परंतु गोलंदाजी इंग्लंडसाठी समस्या निर्माण करू शकते.
जो रूट आणि जसप्रीत बुमराह हे दोघे आमनेसामने असणार आहेत. क्रिकेट विश्वामध्ये जसप्रीत बुमराह जगातील नंबर एक खेळाडू मानला जातो. तर जो रूट याने कसोटी क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीमुळे त्याने महान क्रिकेट खेळाडूंना देखील मागे टाकला आहे. तो लवकरच क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांचा रेकॉर्ड मोडण्याचा फार जवळ आहे. क्रिकेट विश्वातील दोन दिग्गज आज एकमेकांच्या विरोधात आमने-सामने असणार आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत, भारतीय गोलंदाजीचा कणा असलेला जसप्रीत बुमराह आणि इंग्लंडच्या फलंदाजीचा आधारस्तंभ असलेला जो रूट यांच्यात जोरदार लढाई पाहायला मिळणार आहे.
ENG vs IND : पहिल्या सामन्यात तिसऱ्या नंबरचा प्रश्न सुटला! BCCI ने व्हिडीओ शेअर करुन दिली माहिती
जो रूट आणि जसप्रीत बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये २४ वेळा एकमेकांना भिडले आहेत. या काळात बुमराहचा वरचष्मा असल्याचे दिसून येते. जो रूटने आतापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये बुमराहच्या ५५९ चेंडूंचा सामना केला आहे आणि २८६ धावा केल्या आहेत. या काळात रूटला ४११ चेंडूंवर एकही धाव करता आलेली नाही. रूटने बुमराहच्या चेंडूंवर ३६ चौकार मारले आहेत. या काळात त्याचा स्ट्राइक रेट ५१.१६ आणि सरासरी ३१.७७ आहे.
बुमराहने आतापर्यंत कसोटीत ९ वेळा रूटला आपला बळी बनवले आहे. कसोटीत सर्वाधिक वेळा रूटला बाद करणारा बुमराह तिसरा गोलंदाज आहे. पॅट कमिन्सने ११ वेळा आणि जोश हेझलवूडने १० वेळा रूटला पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे.