Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kabbadi : निवड चाचणी स्पर्धेत संघर्ष मंडळ, श्री स्वामी समर्थ मंडळाची विजयी सलामी

Kabbadi : ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने आयोजित केलेल्या कुमार गट कबड्डी स्पर्धेतील पहिल्या साखळीच्या सामन्यात अनेक संघांनी विजयाची नोंद केली. संघर्ष मंडळ, उजाला, रॅडीकल स्पोर्ट्स, ओम् संघ, श्री स्वामी समर्थ संघांनी बाद फेरी गाठली आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 28, 2026 | 08:33 PM
Kabbadi : निवड चाचणी स्पर्धेत संघर्ष मंडळ, श्री स्वामी समर्थ मंडळाची विजयी सलामी

Kabbadi : निवड चाचणी स्पर्धेत संघर्ष मंडळ, श्री स्वामी समर्थ मंडळाची विजयी सलामी

Follow Us
Follow Us:
  • कुमार गटात अनेकांची विजयी आघाडी
  • उजालाच्या विजयात चौधरी बंधू चमकले
  • जय बजरंगच्या कामगिरीत सातत्य
 

संघर्ष मंडळ, उजाला, रॅडीकल स्पोर्ट्स, ओम् संघ, श्री स्वामी समर्थ यांनी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने विजय मंडळाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या कुमार गट कबड्डी (Kabbadi) स्पर्धेत पहिल्या साखळी विजयाची नोंद केली.

वाशिंदच्या जय बजरंगने दोन्ही सामने जिंकत बाद फेरी गाठली आहे. भिवंडी, काल्हेर येथील विजय मंडळाच्या पटांगणावर सुरू असलेल्या कुमारांच्या ‘अ’ गटात संघर्ष मोहने संघाने ग्रीफिन जिमला 25-24 असे चकविले. मध्यंतरला 12-09 अशी आघाडी घेणाऱ्या संघर्षने नंतर सावध खेळ करीत हा निसटता विजय मिळविला.
हर्ष साळुंखे, मंथन सोनकर यांच्या संयमी व धोरणात्मक खेळाला याचे श्रेय जाते. ग्रीफिनच्या आशिष धनावडे, श्रेयस पवार यांनी शेवटच्या क्षणापर्यंत निकराची लढत दिली.

उजालाच्या विजयात चौधरी बंधू चमकले

उजाला संघाने ‘ड’ गटात पूर्वार्धातील 05-11 अशा पिछाडीवरून वास्को स्पोर्ट्सचा 18-15 असा पाडाव केला. जावेद व एजाज या चौधरी बंधुच्या आक्रमक खेळाला याचे श्रेय जाते. वास्कोच्या मयुरेश वाघ, सुजल गायकर यांचा खेळ उत्तरार्धात कमी पडला.

तसेच ओम् संघाने ‘क’ गटात छत्रपती शाहू संघावर 27-22 असा विजय मिळविला. यग्नेश भोपी, प्रसाद यांच्या चढाई, पकडीच्या खेळाने त्यांनी ही किमया केली. छत्रपती शाहूच्या सुगंध राजभर याने एकाकी लढत दिली. रॅडीकल स्पोर्ट्सने ‘ई’ गटात ओम् वर्तक ठाणे संघाचा 29-25 असा पराभव केला. साई ठाकूर, यश म्हात्रे विजयी संघाकडून, तर यश कदम, सार्थक खाडे पराभूत संघाकडून उत्कृष्ट खेळले.

WPL 2027: ऑक्शनपूर्वी बदललं समीकरण! फ्रँचायझींचे मोठे निर्णय; RCB अन् ‘या’ संघांची रिटेन-रिलीज यादी जाहीर

जय बजरंगच्या कामगिरीत सातत्य

जय बजरंग संघाने बाद फेरी गाठताना प्रथम वीर तानाजीचा 36-15 असा, तर नंतर बालगोपाळ मंडळाचा 36-18 असा पाडाव केला. नेहाला गायकर, आशिष सुतार, जयेश गायकवाड यांच्या चतुरस्त्र खेळाने हे दोन्ही विजय सोपे झाले. श्री विठ्ठल मंडळाने देखील ‘ज’ गटात दोन विजय मिळवीत बाद फेरी गाठली.
श्री विठ्ठल संघाने प्रथम वेताळ मंडळाला 28-26 असे नमवीत, तर नंतर विश्वविधाता मंडळावर 30-09 अशी मात करीत बाद फेरी गाठली. निलेश मांडगे, कार्तिक बाटे, उमाकांत खाडे, ओमकार यांच्या खेळाने हे शक्य झाले.

Carrom Tournament : महापौर शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

Web Title: Kabbadi distict selection kabbadi tournament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 08:33 PM

Topics:  

  • Kabbadi
  • Shree Swami Samarth
  • Sports

संबंधित बातम्या

Carrom Tournament : महापौर शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता
1

Carrom Tournament : महापौर शालेय कॅरम स्पर्धेत केवल कुळकर्णी विजेता

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
2

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

carrom tournament : कांदिवलीत रंगणार महापौर चषक, सराव उपक्रमात 42 खेळाडूंचा सहभाग
3

carrom tournament : कांदिवलीत रंगणार महापौर चषक, सराव उपक्रमात 42 खेळाडूंचा सहभाग

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान
4

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.