Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bengaluru Stampede: “मी पोलिसांना दोष…”; चेंगराचेंगरीत १० जणांच्या मृत्यूवर काय म्हणाले डि. के. शिवकुमार?

बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीच्या संघाचा विजयी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अचानक गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने चेंगराचेंगरी झाली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 04, 2025 | 08:04 PM
Bengaluru Stampede: “मी पोलिसांना दोष…”; चेंगराचेंगरीत १० जणांच्या मृत्यूवर काय म्हणाले डि. के. शिवकुमार?
Follow Us
Close
Follow Us:

आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. १८ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ट्रॉफी जिंकल्याने चाहत्यांनामध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. पण या आनंदाला गालबोट लागलें आहे. आरसीबी संघ बेंगळुरूला पोहोचताच, हा उत्साह चाहत्यांसाठी जिवावर बेतला आहे. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी होऊन १० लोकांचे जीव गेला आहे. यावर आता कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीच्या संघाचा विजयी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अचानक गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने चेंगराचेंगरी झाली. पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. मात्र अचानक वाढलेली गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरी झाली आणि त्यात ११ चाहत्यांचा मृत्यू झाला आहे. तरी २५ पेक्षा जास्त लोकही अस्वस्थ असल्याचे सांगितले जात आहे.

या सर्व घटनेवर बोलताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार म्हणाले, ” रॉयल चॅलेंजर्सच्या संघाच्या विजयी सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता. ५ हजारांपेक्षा जास्त पोलीस सुरक्षेसाठी तैनात होते. मी पोलिसांना दोष देणार नाही. घडलेल्या दुर्घटनेबद्दल मी सर्वांची माफी मागतो.”

हे कसले सेलिब्रेशन?
आज आरसीबीचा संघ आपल्या होमपीचमध्ये दाखल झाला. तब्बल १८ वर्षांनी विराट कोहलीचे आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त चिन्नास्वामी स्टेडियमवर संघाचा विजयी सोशल आयोजित करण्यात आला होता. मात्र ३२ हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या मैदानावर येण्यासाठी स्टेडियमबाहेर हजारोंची गर्दी झाली होती.

Bengaluru Stampede: हे कसले सेलिब्रेशन? चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मृत्यूचे तांडव, तरीही RCB चा विजयी सोहळा सुरूच

स्टेडियमवर इतक्या मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी गर्दी केली होती कि पोलिसांना स्टेडियमचे दरवाजे बंद करावे लागले. मात्र या मोठ्या प्रमाणात जमलेल्या गर्दीचे रूपांतर चेंगराचेंगरीत झाले. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५ पेक्षा जास्त नागरिक अस्वस्थ असल्याचे समजते आहे. मात्र बाहेर हे सगळे सुरु असताना देखील स्टेडियमवर आरसीबीच्या संघाचा विजयी सेलिब्रेशन सुरुच होते. त्यामुळे खेकसले सेलिब्रेशन आहे? असंवेदनशीलतेचा कळस असल्याची टीका आता होत आहे. की बाहेर चेंगराचेंगरी होऊन अनेक जणांचा जीव गेला आहे हि बातमी आत पोहोचली नव्हती अशी चर्चा सुरु झाली आहे.

बंगळुरूमध्ये पोहचताच भव्य स्वागत

काल झालेल्या आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब संघाचा ६ धावांनी पराभव केला.  या विजयासह आरसीबीने तब्बल १८ वर्षाचा दुष्काळ संपवला आहे. विजयानंतर संघ बुधवारी दुपारी बेंगळुरूला पोहोचला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ विमानतळावर आला तेव्हा विमानतळाबाहेर उभ्या असणाऱ्या चाहत्यांनी आरसीबी संघाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. विमानतळाबाहेर चाहत्यांची संख्या इतकी होती की पोलिसांची देखील रस्ता मोकळा करताना दमछाक झाली. रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखालील संघ विमानतळावर पोहचताच राज्याचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी संघाचे स्वागत केले.

 

Web Title: Karnataka dcm dk shivkumar statement on rcb celebration bengaluru stampede

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 08:01 PM

Topics:  

  • Bangalore
  • dk shivkumar
  • RCB
  • Stampede Alert

संबंधित बातम्या

RCB चा वेगवान गोलंदाज यश दयालवर UP T20 League मध्ये बंदी! खेळाडूचं करिअर धोक्यात
1

RCB चा वेगवान गोलंदाज यश दयालवर UP T20 League मध्ये बंदी! खेळाडूचं करिअर धोक्यात

हरिद्वारच्या मानसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, ३५ जण जखमी
2

हरिद्वारच्या मानसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, ३५ जण जखमी

Yash Dayal वर दुसरा लैगिंक अत्याचाराचा आरोप, जयपूरमध्ये POCSO कायद्यांतर्गत एफआयआर दाखल
3

Yash Dayal वर दुसरा लैगिंक अत्याचाराचा आरोप, जयपूरमध्ये POCSO कायद्यांतर्गत एफआयआर दाखल

जबाबदार विराट कोहलीच! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारने सादर केला अहवाल, गंभीर निष्काळजीपणाचा उल्लेख
4

जबाबदार विराट कोहलीच! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारने सादर केला अहवाल, गंभीर निष्काळजीपणाचा उल्लेख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.