बंगळुरूमध्ये चेंगराचेंगरीत १० जणांचा मृत्यू (फोटो- सोशल मिडिया)
बंगळुरू: काल अहमदाबादमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएलचा अंतिम सामना खेळवला गेला. यामद्ये विराट कोहलीच्या बंगलोर संघाने विजेतेपद पटकावले आहे. आज त्याच निमित्त बंगळुरूत आरबीसीचा विजयी सोहळा सुरु आहे. मात्र यामध्ये गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये २५ जण अस्वस्थ असल्याचे समजते आहे. तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मृत्यूचे तांडव सुरु असून देखील आतमध्ये आरसीबीचा विजयी सोहळा सुरु आहे. त्यामुळे हा प्रकार म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस असल्याचे म्हटले जात आहे.
आज आरसीबीचा संघ आपल्या होमपीचमध्ये दाखल झाला. तब्बल १८ वर्षांनी विराट कोहलीचे आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त चिन्नास्वामी स्टेडियमवर संघाचा विजयी सोशल आयोजित करण्यात आला होता. मात्र ३२ हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या मैदानावर येण्यासाठी स्टेडियमबाहेर हजारोंची गर्दी झाली होती.
स्टेडियमवर इतक्या मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी गर्दी केली होती कि पोलिसांना स्टेडियमचे दरवाजे बंद करावे लागले. मात्र या मोठ्या प्रमाणात जमलेल्या गर्दीचे रूपांतर चेंगराचेंगरीत झाले. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५ पेक्षा जास्त नागरिक अस्वस्थ असल्याचे समजते आहे. मात्र बाहेर हे सगळे सुरु असताना देखील स्टेडियमवर आरसीबीच्या संघाचा विजयी सेलिब्रेशन सुरुच होते. त्यामुळे खेकसले सेलिब्रेशन आहे? असंवेदनशीलतेचा कळस असल्याची टीका आता होत आहे. की बाहेर चेंगराचेंगरी होऊन अनेक जणांचा जीव गेला आहे हि बातमी आत पोहोचली नव्हती अशी चर्चा सुरु झाली आहे.
काल झालेल्या आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब संघाचा ६ धावांनी पराभव केला. या विजयासह आरसीबीने तब्बल १८ वर्षाचा दुष्काळ संपवला आहे. विजयानंतर संघ बुधवारी दुपारी बेंगळुरूला पोहोचला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ विमानतळावर आला तेव्हा विमानतळाबाहेर उभ्या असणाऱ्या चाहत्यांनी आरसीबी संघाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. विमानतळाबाहेर चाहत्यांची संख्या इतकी होती की पोलिसांची देखील रस्ता मोकळा करताना दमछाक झाली. रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखालील संघ विमानतळावर पोहचताच राज्याचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी संघाचे स्वागत केले.
आरसीबी संघ १८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आयपीएल विजेता ठरला आहे. पंजाबला पराभूत करत आरसीबीने इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने १९० धावा केल्या होत्या. आरसीबीकडून विराट कोहली (४३), रजत पाटीदार (२६), लियाम लिव्हिंगस्टोन (२५) आणि जितेश शर्मा (२४) यांनी महत्वाची भूमिका बजावली. प्रत्युउत्तरात पंजाबचा संघ १८४ धावाच करू शकला. आरसीबीच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत पंजाबला विजयापासून रोखले. पीबीकेएसकडून शशांक सिंगने ३० चेंडूत ६१ धावांची तुफानी खेळी केली, परंतु तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.