Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kho-Kho Championship : महाराष्ट्राच्या सुवर्णपदकासाठी खो-खोपटूंचे रणशिंग! मुलींचा धाराशिवमध्ये, तर कुमार संघाचा सांगलीत सराव

Kho-Kho Championship : वडोदरा येथे 21 ते 25 नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या 45 व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कुमार आणि मुलींच्या संघांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. मुली धाराशिवमध्ये, तर कुमार संघ सांगलीत सराव करत आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 02, 2026 | 08:51 PM
Kho-Kho Championship : महाराष्ट्राच्या सुवर्णपदकासाठी खो-खोपटूंचे रणशिंग! मुलींचा धाराशिवमध्ये, तर कुमार संघाचा सांगलीत सराव

Kho-Kho Championship : महाराष्ट्राच्या सुवर्णपदकासाठी खो-खोपटूंचे रणशिंग! मुलींचा धाराशिवमध्ये, तर कुमार संघाचा सांगलीत सराव

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रीय विजेतेपदासाठी दोन्ही संघांची कसून तयारी
  • 21 ते 25 नोव्हेंबरदरम्यान वडोदऱ्यात रंगणार स्पर्धा
  • 19 नोव्हेंबरपर्यंत प्रशिक्षण शिबिर चालणार
 

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत (Kho-Kho Championship) महाराष्ट्राचा दबदबा कायम राखण्यासाठी राज्याच्या कुमार आणि मुलींच्या संघांनी कंबर कसली आहे. गुजरातमधील वडोदरा येथे होणाऱ्या 45 व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे लक्ष्य ठेवून दोन्ही संघांची विशेष निवासी प्रशिक्षण शिबिरे सुरू झाली आहेत.
मुलींचा संघ धाराशिवमध्ये, तर कुमार संघ सांगली येथे सराव करत आहे. कौशल्य, वेग, तंदुरुस्ती आणि सांघिक समन्वयावर भर देत खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज होत आहेत.

धाराशिवमध्ये मुलींच्या शिबिराचा शुभारंभ

महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाचे प्रशिक्षण शिबिर 1 नोव्हेंबरपासून धाराशिव येथे सुरू झाले. धाराशिव नगरपालिकेच्या अध्यक्षा नेहाताई काकडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक राहुल काकडे, नगरसेविका राजकन्या अडसूळ, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सरचिटणीस डॉ. चंद्रजीत जाधव, प्रशिक्षण विभागप्रमुख राजेंद्र साप्ते आणि अथर्व तापडिया उपस्थित होते.

Rising Stars Asia Cup 2026 साठी भारताचा संघ जाहीर; तिलक वर्माकडे कर्णधारपद; युवा ब्रिगेड उतरणार मैदानात

शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांकडून मार्गदर्शन

शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त रोहिणी आवारे आणि शिवछत्रपती राज्य क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारप्राप्त प्रवीण बागल यांनी खेळाडूंशी संवाद साधला. राष्ट्रीय स्पर्धेतील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास, जिद्द आणि सातत्यपूर्ण मेहनत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

मुलींच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून अभिजीत पाटील, तर सहाय्यक प्रशिक्षिका म्हणून समृद्धी पाटील जबाबदारी सांभाळणार आहेत. खेळाडूंची शारीरिक क्षमता, वेग, चपळाई, बचाव आणि आक्रमणातील अचूकता यावर प्रशिक्षण शिबिरात विशेष भर दिला जाणार आहे. यावेळी प्रभाकर काळे, विवेक कापसे यांच्यासह क्रीडाप्रेमी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Badminton कोर्टवर चुरशीच्या लढती; मुलांमध्ये रायगड, तर मुलींमध्ये…; सेमीफायनलमध्ये कोणाचा प्रवेश?

सांगलीत कुमार संघाची विजेतेपदासाठी तयारी

दुसरीकडे, महाराष्ट्राच्या कुमार संघाचे प्रशिक्षण शिबिर सांगली येथे सुरू झाले आहे. सांगलीचे जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या कोचिंग विंगचे गुरुदत्त चव्हाण, डॉ. अमित राव्हटे, प्रा. सचिन चव्हाण, तुकाराम माळी आणि अमोल देवकते उपस्थित होते. त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्राच्या कुमार संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पंढरीनाथ बडगुजर काम पाहणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंच्या खेळातील सातत्य, आक्रमणातील वेग, बचावातील चपळाई, निर्णयक्षमता आणि सांघिक समन्वय यावर भर दिला जाणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देण्यासाठी खेळाडूंना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट प्रशिक्षण शिबिरातून ठेवण्यात आले आहे.

गुजरातमधील वडोदरा येथे 21 ते 25 नोव्हेंबर 2026 या कालावधीत 45 वी कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी 1 ते 19 नोव्हेंबरदरम्यान दोन्ही संघांची विशेष निवासी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाराष्ट्राच्या मुलींच्या खो-खो संघाचे प्रशिक्षण कुठे सुरू आहे?

    Ans: महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाचे निवासी प्रशिक्षण शिबिर धाराशिव येथे सुरू झाले आहे.

  • Que: महाराष्ट्राच्या कुमार संघाचे प्रशिक्षण कुठे सुरू आहे?

    Ans: कुमार संघाचे प्रशिक्षण शिबिर सांगली येथे आयोजित करण्यात आले आहे.

  • Que: महाराष्ट्राच्या दोन्ही संघांचे प्रमुख लक्ष्य काय आहे?

    Ans: राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करून सुवर्णपदक पटकावणे हे महाराष्ट्राच्या कुमार आणि मुलींच्या संघांचे प्रमुख लक्ष्य आहे.

Web Title: Kho kho championship maharashtra kho kho team national championship training camp rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 08:51 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Kho Kho Tournament

संबंधित बातम्या

Dharashiv News: दुष्काळाच्या संकटात शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालकांच्या पाठीशी जिल्हा परिषद उभी राहणार; अर्चनाताई पाटील यांची ग्वाही
1

Dharashiv News: दुष्काळाच्या संकटात शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालकांच्या पाठीशी जिल्हा परिषद उभी राहणार; अर्चनाताई पाटील यांची ग्वाही

Dharashiv Bus Stand: धाराशिव बसस्थानकात अतिक्रमणाला अधिकाऱ्यांचे अभय? महिला स्वच्छतागृहाचे व्हेंटिलेशन बंद
2

Dharashiv Bus Stand: धाराशिव बसस्थानकात अतिक्रमणाला अधिकाऱ्यांचे अभय? महिला स्वच्छतागृहाचे व्हेंटिलेशन बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.