फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants 1st innings report : ईडन गार्डन्सवर कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यामध्ये सामना सुरू आहे. या सामन्याचा पहिला डाव संपला आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर त्यांना हा निर्णय चांगलाच महालात पडलेला दिसत आहे. कोलकाता नाईट रायडर्ससमोर लखनौ सुपर जायंट्सने 239 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. दोनच संघ आज तिसऱ्या विजयाच्या शोधात आहेत. आज जो संघ या सामन्यात विजय मिळवेल तो संघ आज त्याच्या नावावर स्पर्धेचा तिसरा विजय नावावर करेल.
लखनऊ सुपर जायंटचे दोन सलामीवीर फलंदाज मिचेल मार्श आणि ईडन मार्करम या दोघांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. लखनऊ सुपर जेन्ट्स ने पहिला विकेट अकराव्या ओव्हरमध्ये गमावला. ईडन मार्करमने संघासाठी २८ चेंडूंमध्ये ४७ धावा केल्या त्यामध्ये त्याने दोन षटकार आणि चार चौकार मारले. मिचेल मार्शने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध धुव्वादार खेळी खेळली. त्याने ४८ चेंडूंमध्ये ८१ धावा केल्या. यात त्याने ५ षटकार आणि ६ चौकार मारले, त्याने १६८ चा स्ट्राइक रेटने आज फलंदाजी केली.
Innings Break!#LSG sent the ball flying to all parts of the park en route to 2️⃣3️⃣8️⃣ / 3️⃣ 💥
Will #KKR chase this mammoth 🎯 ? 🤔
Scorecard ▶ https://t.co/3bQPKnwPTU#TATAIPL | #KKRvLSG pic.twitter.com/0BckdSI9Me
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2025
लखनऊ सुपर जायंट्सने संघासाठी ३६ धावांमध्ये ८७ धावा केल्या. यामध्ये त्याने ५ षटकार आणि ७ षटकार ठोकले. पूरनने संघासाठी २४१ च्या स्ट्राईक रेटने संघासाठी धुव्वादार कामगिरी केली आहे. त्याने फक्त या स्पर्धेतच नाही तर या स्पर्धेमध्ये त्याने सातत्याने कमालीचा खेळ दाखवला आहे. लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजांनी आजच्या सामन्यात सर्वाच्च धावसंख्या उभी केली आहे. त्याचबरोबर संघाच्या फलंदाजांनी कमालीची फलंदाजी करून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे.
MI vs RCB : RCB च्या कर्णधार Rajat Patidar चे दिलदार मन! सामनावीर पुरस्कार केला ‘त्यांना’ समर्पित..
कोलकाता नाईट राइडर्सच्या फलंदाजांनी आज विशेष कामगिरी करू शकले नाही. केकेआरसाठी हर्षित राणाने ४ ओव्हर टाकल्या आणि ५१ धावा देत २ विकेट्स घेतल्या तर आंद्रे रसेलने संघासाठी १ विकेट घेतला. वैभव अरोडा, स्पेन्सर जॉनसन, वरून चक्रवर्ती आणि सुनील नरेन यांच्या हाती एकही विकेट लागली नाही.
कोलकाता नाईट राइडर्सच्या फलंदाजीचा विचार केला तर क्विंटन डी कॉकने या स्पर्धेमध्ये कमालीचा खेळ दाखवला आहे तर काही सामन्यांमध्ये तो फेलही ठरला आहे. त्यामुळे आजच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे. आंद्रे रसेलला संघासाठी मोठी कामगिरी करता आली नाही आज संघासमोर मोठी धावसंख्या आहे त्यामुळे तो कशी कामगिरी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष्य लागले आहे.