MI vs RCB : RCB च्या कर्णधार Rajat Patidar चे दिलदार मन! (फोटो-सोशल मीडिया)
MI vs RCB : रजत पाटीदारचे नेतृत्व चांगलेच फळाला आले आहे. आयपीएल २०२५ च्या हंगामात आरसीबी चांगली कामगिरी करताना दिसून येत आहे. रजतच्या नेतृत्वाखाली आरसीबीने १७ वर्षांनंतर चेपॉक येथे पाच वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभूत केल्यानंतर, आरसीबीने आता वानखेडे येथे पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सला पराभूत केले आहे. आरसीबीने दिलेल्या २२२ धावांचा पाठलाग मैदानात उतरलेल्या मुंबईला आरसीबीने १२ धावांनी पराभूत केले आहे. मुंबईकडून तिलक वर्मा आणि कर्णधार हार्दिक पंड्या यांच्यात चांगली भागीदारी रचण्यात आली. मुंबई विजय मिळवेल असे वाटत असताना आरसीबीने धोकादायक तिलक आणि हार्दिकला एकामागून एक माघारी पाठवले आणि आरसीबीने विजय संपदान केला. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने ३२ चेंडूत ६४ धावांची खेळी करून सामनावीर पुरस्कारावर नाव कोरले.
मुंबई इंडियन्सवर १२ धावांनी विजय मिळवल्यानंतर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार रजत पाटीदारने अशा या अतिटतीच्या सामन्यात लक्ष्याचा बचाव करणाऱ्या गोलंदाजांचे कौतुक केले आहे. तो म्हणाला की त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला तो केवळ प्रत्यक्षात मुंबईतील फलंदाजांना अनुकूल परिस्थितीत फलंदाजी युनिटवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असल्यामूळचे, हे शक्य झाले.
आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने सामन्यानंतरच्या सादरीकरणात बोलत होता. तो म्हणाला की, हा खरोखरच एक अद्भुत सामना होता. गोलंदाजांनी ज्या पद्धतीने हिंमत दाखवली आणि ते सर्वकाही अद्भुत होते. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, हा पुरस्कार गोलंदाजी युनिटला जातो कारण, या मैदानावर फलंदाजी युनिटला रोखणे हे सोपे काम नाही.
तसेच पाटीदार पुढे म्हणाला की, वेगवान गोलंदाजांनी ज्या पद्धतीने त्यांचे नियोजन आखले आणि अंमलात आणले ते अद्भुत असेच होते. कृणालने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे ती अद्भुत होती. शेवटच्या षटकात ते अवघड काम हते, सोपे नव्हते, मला वाटते की त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि दाखवलेले धाडस अद्भुत असे आहे.
हेही वाचा : MI vs RCB : मुंबईविरुद्धच्या विजयानंतर BCCI चा दणका! रजत पाटीदारवर मोठी कारवाई, कारण आलं समोर..
कर्णधार रजत पुढे म्हणाला की, आम्हाला शेवटपर्यंत खेळ घेऊन जायचा होता. म्हणून, आम्ही सामना शेवटच्या षटकापर्यंत नेण्यावर आणि शेवटी कृणाल पंड्याला एक षटक टाकायला लावण्यावर चर्चा केली होती. विकेट चांगली होती तसेच चेंडू देखील बॅटवर व्यवस्थित येत होता.