फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
Rishabh Pant’s disappointing performance in IPL 2025 : लखनऊ सुपर जायंट्सचा सामना आज ईडन गार्डनवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सुरु आहे. या सामन्यांमध्ये लखनऊचा संघ २३९ धावसंख्या उभी करण्यात यशस्वी झाला आहे. यामध्ये मिचेल मार्श, इडन मार्करम आणि निकोलस पुरण यांनी संघासाठी धुव्वादार फलंदाजी केली. हे फलंदाज संघासाठी सातत्याने कमालीची फलंदाजी करत आहेत. पण लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार रिषभ पंतची बॅट आतापर्यत शांतच राहिली आहे. त्याने झालेल्या पाच सामन्यांमध्ये फक्त १९ धावा केल्या आहेत, त्याने या स्पर्धेमध्ये २० चा आकडा देखील पार केला नाही.
आयपीएल २०२५ चा मेगा लिलाव झाला, बरीच वर्ष दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद संभाळल्यानंतर त्याने त्याचे नाव मेगा लिलावामध्ये सामील केले. यावेळी रिषभ पंतचे लिलावामध्ये नाव पाहून क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मेगा लिलावामध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने त्याला पुन्हा संघामध्ये घेण्याचा प्रयत्न केला होता पण लखनौ सुपर जायंट्सचे संजीव गोएंका यांनी त्याच्यावर २७ कोटींची बोली लावली आणि संघामध्ये सामील केले. आता रिषभ पंत हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. पण आतापर्यत संघाचे पाच सामने झाले आहेत पण त्याने संघासाठी विशेष कामगिरी केली नाही.
Either Rishabh Pant is hiding in fear—sending in Abdul Samad on a flat pitch—or even LSG management has finally given up on Rishabh Pant.
Goenka was hyping this 27 crore scammer as the “X-Factor,” btw. pic.twitter.com/lF2Eo4mbGf
— StarcyKKR (@StarcKKR) April 8, 2025
पहिल्या सामन्यांमध्ये रिषभ पंतने ६ चेंडू खेळले होते, यामध्ये त्याने ० धावा करून बाद झाला होता. दुसऱ्या सामन्यात देईल तो विशेष कामगिरी करू शकला नाही. त्याने १५ चेंडूमध्ये १५ धावा केल्या आणि विकेट्स गमावली होती. मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये लखनौ सुपर जायंट्सने सामना जिंकला होता या सामन्यातही रिषभ पंत फेल ठरला होता. या सामन्यात त्याने ५ चेंडू खेळले होते त्याने तो २ धावा करून त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. याच त्याच्या खराब फॉर्ममुळे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्यांमध्ये त्याने स्वतःला वगळले आणि त्याच्या जागेवर फलंदाजीसाठी पहिले अब्दुल समद आणि त्यानंतर डेव्हिड मिलरला पाठवले.
मागील सीझनमध्ये केएल राहुलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता यामध्ये संजीव गोएंका हे खेळाडूंना ओरडताना दिसत होते. यावेळी खेळाडू आणि मालक मोठ्या वादात सापडले होते. त्याचप्रकारचा व्हिडीओ रिषभ पंत आणि संजीव गोएंका यांचा व्हायरल झाला होता. यामध्ये संजीव गोएंका हे रिषभ पंतवर संतापलेले दिसत होते.