फोटो सौजन्य - BCCI
केएल राहुलने नवा रेकाॅर्ड केला नावावर : भारताच्या संघाने इंग्लड दौऱ्यावर आतापर्यत झालेल्या सामन्यांमध्ये कमालीची फलंदाजी केली आहे. यामध्ये भारताचा कर्णधार शुभमन गिल, ऋषभ पंत, यशस्वी जयस्वाल, केएल राहुल आणि रविद्र जडेजा यांनी त्याच्या फलंदाजीने भारतीय क्रिकेट चाहत्यांना प्रभावित केले आहे. केएल त्याच्या क्लासी फलंदाजीसाठी ओळखला जातो. इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल शानदार फलंदाजी करत आहे.
लॉर्ड्सवर खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने अर्धशतकही झळकावले. या अर्धशतकाच्या मदतीने राहुलने पाकिस्तानचा सईद अन्वर आणि भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांना एकाच झटक्यात मागे टाकले आहे. आता सुनील गावस्करसह केएल राहुलचे नाव त्या तीन निवडक खेळाडूंच्या यादीत जोडले गेले आहे ज्यांनी SENA देशांमध्ये आशियाई सलामीवीर म्हणून १०,५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. येथे SENA देश म्हणजे दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया.
लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी केएल राहुलकडून मोठी खेळी होण्याची अपेक्षा आहे. दुसऱ्या दिवसअखेर भारताने इंग्लंडच्या ३८७ धावांच्या तुलनेत ३ विकेट गमावून १४५ धावा केल्या आहेत. यजमान संघाकडे अजूनही २४२ धावांची आघाडी आहे. जर केएल राहुलने लॉर्ड्सवर शतक झळकावले तर तो निश्चितच सामना भारताच्या बाजूने वळवू शकतो.
भारताने प्रथम फलंदाजी करत २८० धावा केल्या. सामन्यादरम्यान पाऊस पडला आणि त्यामुळे डीएल पद्धतीने लक्ष्य २८१ वरून २७१ असे कमी करण्यात आले. इंग्लंडला ४८.५ षटकांत या धावा करायच्या होत्या. इंग्लंडचा संघ २७१ धावांवरच ऑलआउट झाला आणि सामना बरोबरीत सुटला. लॉर्ड्सवरील पहिला सामना विराटसाठी काही खास ठरला नाही.
लॉर्ड्सवर खेळला जाणारा भारत आणि इंग्लंडमधील तिसरा कसोटी सामना सध्या रोमांचक परिस्थितीत आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ३८७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारताने दुसऱ्या दिवसअखेर ३ विकेट गमावून १४५ धावा केल्या. टीम इंडिया अजूनही २४२ धावांनी मागे आहे. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला चाहत्यांची नजर भारतीय संघावर असेल. इंग्लंडची ही आघाडी संपवून आघाडी घेऊन त्यांच्यावर दबाव आणायचा आहे.