फोटो सौजन्य - BCCI
भारत विरुद्ध इंग्लंड तिसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिनाचा अहवाल : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या लॉट्स कसोटीचा काल दुसरा दिवस पार पडला. या सामन्यांमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी आणखी एकदा जादू दाखवली. त्याने संघासाठी या सामन्यात देखील पहिल्या डावांमध्ये पाच विकेट्स नावावर केले. इंग्लंडच्या संघासाठी जो रूट याने शतक झळकावले त्याचबरोबर कार्स याने अर्धशतक ठोकले.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या. भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांचे कामगिरीबद्दल सांगायचं झाले तर पहिल्या दिनी भारताच्या संघाने चार विकेट्स इंग्लंडचे घेतले होते. दुसऱ्या सेशन पर्यंत भारताच्या संघाने इंग्लंडच्या संघाला सर्वाबाद केले आणि 387 धावांवर रोखले. भारतीय संघाच्या गोलंदाजी बद्दल सांगायचं झाले तर जसप्रीत बुमराह यांनी संघासाठी पाच विकेटची कमाई केली. यामध्ये त्याने जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्ट्रोक्स, क्रिस वोक्स आणि जोफ्रा आर्चर यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
मोहम्मद सिराज आणि निलेश कुमार रेड्डी या दोघांनी संघाला दोन दोन विकेट्स मिळवून दिले. नितीश कुमार रेड्डी आणि इंग्लंडच्या दोन्ही सलामी वीर फलंदाजांना बाहेर रस्ता दाखवला. तर सिराज याने जेमी स्मित आणि कार्स या दोघांना बाद केले. भारतीय संघ सध्या दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करत आहे. भारताच्या संघाने दुसऱ्या दिनाचे समाप्तीनंतर तीन विकेट्स गमावले आहेत सध्या केएल राहुल आणि ऋषभ पंत हे दोघे फलंदाजी करत आहेत.
That’s stumps on Day 2!
KL Rahul and Vice-captain Rishabh Pant are in the middle 🤝 #TeamIndia trail by 242 runs in the first innings
Scorecard ▶️ https://t.co/omiZVl0Plb#ENGvIND pic.twitter.com/KU2IRcQO0Z
— BCCI (@BCCI) July 11, 2025
यशस्वी जयस्वाल हा स्वस्तात बाद झाला, त्याने 13 धावा केल्या आणि विकेट्स गमावली. करून नायर याने दुसरा दिनी सामन्यात ४० धावांची खेळी खेळली. भारताचा कर्णधार शुभमन गिल या सामन्यांमध्ये फेल ठरला. या सामन्यात त्याने 14 धावा केल्या आणि विकेट गमावली.
भारतीय संघासाठी हा सामना फारच महत्वाचा असणार आहे, सध्या केएल राहुल आणि ऋषभ पंत हे दोघे फलंदाजी करत आहेत. भारताच्या संघाने ३ विकेट्स गमावल्यानंतर केएल राहुल आणि ऋषभ पंत या दोघांच्या खाद्यावर जबाबदारी असणार आहे. रविद्र जडेजा, नितिश कुमार रेड्डी, वाॅशिंग्टन सुंदर यांची फलंदाजी अजुन आली नाही.