फोटो सौजन्य - सोशल मिडिया
हॉकी आशिया कप २०२५ आजपासून सुरू होत आहे. ही स्पर्धा टीम इंडियासाठी महत्त्वाची असणार आहे. २०२६ मध्ये होणाऱ्या हॉकी वर्ल्ड कपसाठी येथून पात्रता मिळवायची आहे. आज भारताचा सामना चीनशी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हॉकी आशिया कपपूर्वी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
आज भारतीय संघ आशिया कप २०२५ मध्ये चीनशी सामना करणार आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. चीनविरुद्धचा त्यांचा सामना दुपारी ३ वाजता होणार आहे. चाहत्यांना या स्पर्धेतील सर्व सामन्यांचे लाईव्ह अॅक्शन सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. हा सामना बिहारमधील राजगीर शहरातील राजगीर हॉकी स्टेडियममध्ये खेळवला जाईल.
भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी हॉकी आशिया कपच्या संघांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “आशिया कपमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व संघांना, खेळाडूंना, अधिकाऱ्यांना आणि चाहत्यांना मी शुभेच्छा देतो. मला विश्वास आहे की ही हॉकी स्पर्धा रोमांचक सामने, अपवादात्मक प्रतिभेचे प्रदर्शन आणि संस्मरणीय क्षणांनी भरलेली असेल.”
फॉरवर्ड – मनदीप सिंग, शिलानंद लाक्रा, अभिषेक, सुखजित सिंग आणि दिलप्रीत सिंग
मिडफिल्डर – राजिंदर सिंग, राज कुमार पाल, हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग आणि विवेक सागर प्रसाद
बचावपटू – सुमित, जर्मनप्रीत सिंग, संजय, हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास आणि जुगराज सिंग
गोलरक्षक – कृष्णन बी पाठक आणि सूरज करकेरा
राखीव पर्याय: नीलम संजीप आणि सेल्वम कार्ती
FIH प्रो लीगमध्ये टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक होती. त्यांना सलग ७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांना विश्वचषकासाठी पात्रता मिळवणे कठीण होईल. २०२६ च्या आशिया कपमध्ये चांगली कामगिरी संघाच्या विजयाचा मार्ग मोकळा करू शकते. मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांना विश्वास आहे की भारतीय संघ विश्वचषकासाठी पात्र ठरेल.
भारत गेल्या अनेक वर्षांपासून हॉकी आशिया कपमध्ये सहभागी होत आहे. आतापर्यंत त्यांनी ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे. २००३, २००७ आणि २०१७ मध्ये टीम इंडियाने ट्रॉफी जिंकली. भारत ५ वेळा उपविजेता राहिला आहे. १९८२, १९८५, १९९४ आणि २०१३ मध्ये ते अंतिम फेरीत पोहोचले पण जिंकू शकले नाहीत.