
फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
DC vs KKR first innings report : दिल्ली कॅपिटल्सचा घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामना सुरु आहे. या सामन्यांमधील पहिला डाव झाला आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून अरुण जेटली मैदानावर पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात कोलकता नाईट राइडर्सच्या संघाने पहिले फलंदाजी करत ९ विकेट्स गमावून 205 धावांचे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध उभे केले आहे. आजच्या सामन्यात केकेआरच्या फलंदाजांनी मोठी खेळली नाही पण फलंदाजांनी जलद गतीने धावा केल्या त्याचा फायदा त्यांना आजच्या सामन्यात झाला. आजच्या पहिल्या डावांमध्ये कशाप्रकारे खेळाडूंनी कामगिरी केली यासंदर्भात सविस्तर वाचा.
आजच्या सामन्यातील कोलकाता नाईट राइडर्सच्या फलंदाजीचे सांगायचे झाले तर सुनील नारायण आणि रहमानुल्लाह गुरबाज या दोघांनी आजच्या सामन्यात फटकेबाजी सुरु केली. आजच्या सामन्यात रहमानुल्लाह गुरबाज याने संघासाठी आज १२ चेंडूंमध्ये २६ धावा केल्या, यामध्ये त्यांना १ षटकार आणि ५ चौकार मारले. सुनील नारायणने याने संघासाठी १६ चेंडूंमध्ये २७ धावा केल्या. कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने आजच्या सामन्यात १४ चेंडूंमध्ये २६ धावा केल्या आणि त्याने विकेट गमावली. अंगकृष रघुवंशी याने संघासाठी आज महत्वाची खेळी खेळली.
Innings Break! An action-packed and highly competitive first half sees #KKR set a 🎯 of 2️⃣0️⃣5️⃣ for #DC. 2 points loading for? ⏳ Scorecard ▶ https://t.co/saNudbWaXT #TATAIPL | #DCvKKR pic.twitter.com/BP19soTUtn — IndianPremierLeague (@IPL) April 29, 2025
आजच्या सामन्यात अंगकृष रघुवंशी याने संघासाठी ४४ धावा केल्या यामध्ये त्याने २ षटकार आणि ३ चौकार मारले. वेंकटेश अय्यर आणखी एकदा फेल ठरला. त्याने आजच्या सामन्यात ५ चेंडू खेळले आणि ७ धावा करून विकेट गमावला. रिंकू सिंह याने महत्वाची खेळी खेळली, यामध्ये त्याने २५ चेंडूंमध्ये ३६ धावा केल्या. आंद्रे रसेलने संघासाठी ९ चेंडूंमध्ये धावा केल्या.
दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर मिचेल स्टार्कच्या हाती ३ विकेट लागले. रहमानुल्लाह गुरबाज, रोवमन पॉवेल आणि अनुकूल रॉय या तिघांना बाहेरचा रस्ता दाखवला. अक्षर पटेल आणि विप्राज निगम या दोघांनी प्रत्येकी दोन विकेट घेतले. चमिराच्या हाती आज १ विकेट घेतला.