वैभव सूर्यवंशी(फोटो-सोशल मिडिया)
IPL 2025 : काल आयपीएल २०२५ मधील ४७ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळण्यात आला. हा सामन्यात राजस्थान रॉयल्सने एकतर्फी विजय मिळवला. सामन्यापूर्वी रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत २०९ धावा केल्या. प्रतिउत्तरात राजस्थानने हे लक्ष्य १६ व्या षटकातच पूर्ण केले. या सामन्याचा हीरो ठरला तो म्हणजे वैभव सूर्यवंशी, ज्याने अवघ्या ३५ चेंडूत १०० धावा केल्या. त्याच्या या खेळीने सर्वांचे अलक्ष वेधून घेतले. वैभव सूर्यवंशी आयपीएलच्या इतिहासात शतक करणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. त्याने युसूफ पठाणचा विक्रम देखील मोडीत काढला. युसूफ पठाणने आयपीएलमध्ये ३७ चेंडूत शतक ठोकले होते. पण या सामन्यात त्याने ३५ चेंडूत शतक ठोकून पठाणचा हा विक्रमही मागे टाकला.
यासह, वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकवणारा दुसरा फलंदाज बनला आहे. या खेळीत त्याने ११ षटकार आणि ७ चौकारांची आतिषबाजी केली आहे. वैभव नावाच्या वादळालाला प्रसिद्ध कृष्णाने शमविले. तो ३७ चेंडूत १०१ धावांवर असताना कृष्णाने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. वैभवच्या या खेळीनंतर, अनेकांना असे वाटू लागले आहे की, वैभव काही वर्षांनी टीम इंडियाचा भाग असणार आहे. यामुळे भारताच्या आणखी दोन तरुण सलामीवीरांच्या कारकिर्दीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. बोलले जाता आहे.
पृथ्वी शॉ
पृथ्वी शॉ सध्या आयपीएलमध्ये खेळताना दिसत नाहीये. कारण त्याला कुणी खरेडीदार मिळाला नाही. परंतु, तो यापूर्वी भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. सध्या त्याला अनुशासनहीनतेमुळे टीम इंडियामध्ये संधी देण्यात येत नाहीये. यामुळेच तो सध्या क्रिकेटच्या मैदनापासून दूर आहे. वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे पाहता असे दिसून येते की, पृथ्वी शॉचे टीम इंडियामध्ये पुनरागमन आता जवळजवळ कठीण झाले आहे.
अभिषेक शर्मा
वैभव सूर्यवंशी हा भविष्यात स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मासाठी देखील धोका निर्माण करू शकतो. अभिषेक शर्मा हा देखील एक स्फोटक फलंदाज म्हणून नावारूपाला आला आहे. तो सदया सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे. तो टी-२० मध्ये देखील टीम इंडियाचा एक भाग आहे. पण जर वैभव सूर्यवंशी काही वर्षे असाच स्फोटक फलंदाजी करत राहिला तर मात्र तो अभिषेक शर्माची जागा घेऊ शकतो. असे मानले जाऊ लागेल आहे.