Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुलदीप यादवचा मोठा निर्णय! टीम इंडियात संधी नाही, आता ‘या’ संघाकडून खेळणार

Kuldeep yadav Will Play For Yorkshire county Championship: इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत एकही सामना खेळण्याची संधी न मिळालेल्या टीम इंडियाचा स्टार फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने आता काउंटीमध्ये यॉर्कशायरकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 22, 2026 | 06:38 PM
कुलदीप यादवचा मोठा निर्णय! टीम इंडियात संधी नाही, आता ‘या’ संघाकडून खेळणार
Follow Us
Follow Us:
  • कुलदीप यादवचा मोठा निर्णय
  • टीम इंडियात संधी नाही
  • आता ‘या’ संघाकडून खेळणार
भारतीय फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. कुलदीपने बुधवारी (दि.२२) इंग्लिश काउंटी क्लब यॉर्कशायरसोबत करार केला. तो या हंगामात संघासाठी आठ सामने खेळेल. कुलदीप काही काळापासून भारतीय संघात नव्हता, पण आता तो काउंटी क्रिकेट खेळणार आहे. तो २४ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान इंग्लंडमध्ये होणाऱ्या यॉर्कशायरच्या देशांतर्गत एकदिवसीय चषक स्पर्धेत खेळेल. कुलदीप काउंटी चॅम्पियनशिपमध्ये यॉर्कशायरसाठी तीन सामनेही खेळणार आहे.

ललित मोदींना मोठा दिलासा; IPL 2009 FEMA प्रकरणात क्लीन चीट, 16 वर्षांनी मायदेशी परतणार

काउंटी क्रिकेट क्लबने केली घोषण

यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे की, भारतीय फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला परदेशी खेळाडू म्हणून करारबद्ध केल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. हा ३१ वर्षीय खेळाडू पाच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) सामन्यांसाठी उपलब्ध असेल आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये होणाऱ्या काउंटी चॅम्पियनशिपच्या शेवटच्या चार सामन्यांपैकी तीन सामन्यांसाठी तो हेडिंग्ले येथे परत येईल.

यॉर्कशायरमध्ये सामील होण्यासाठी कुलदीप उत्सुक

यॉर्कशायरमध्ये सामील झाल्यावर कुलदीप म्हणाला, ‘मला यॉर्कशायरमध्ये सामील झाल्याचा खूप आनंद आहे आणि या संधीबद्दल मी आभारी आहे. यॉर्कशायरसारखा ऐतिहासिक क्लबचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्यासाठी खरोखरच सन्मानाचा क्षण असेल. मला इंग्लंडमधील परिस्थितीत खेळण्याचे आव्हान नेहमीच आवडले आहे आणि व्यवस्थापनाशी बोलल्यानंतर, मी संघात सामील होण्यासाठी खूप उत्सुक आहे.’ कुलदीप यादव हा यॉर्कशायरकडून खेळणारा पाचवा भारतीय खेळाडू असणार आहे.

✍️ Yorkshire CCC is delighted to announce the signing of Indian international Kuldeep Yadav, who will join the White Rose for five Metro Bank One Day Cup games and three Rothesay County Championship fixtures. Find out more here 👉️ https://t.co/9kZlxcwjzM pic.twitter.com/nu9AaWFMct — Yorkshire CCC (@YorkshireCCC) July 22, 2026

भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्याच्या क्षमतेवर फारसा विश्वास दाखवला नाही, परंतु यॉर्कशायर व्यवस्थापनाचा विश्वास आहे की इंग्लंडमधील परिस्थितीत कुलदीप संघासाठी फायदेशीर ठरेल. यॉर्कशायरचे क्रिकेटचे महाव्यवस्थापक, गॅविन हॅमिल्टन म्हणाले, “कुलदीप एक उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू आहे जो या सामन्यांदरम्यान आमच्या संघाची मोठी ताकद बनेल.

कुलदीपची दमदार कामगिरी

कुलदीपने १८ कसोटी सामन्यांमध्ये ७९ विकेट्स घेतले असून, त्याची सर्वोत्तम कामगिरी ४० धावांत पाच विकेट्स ही आहे. २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती, ज्यात त्याने पाच सामन्यांमध्ये १९ विकेट्स घेतले होते. एकदिवसीय सामन्यात त्याने १९४ विकेट्स घेतले असून, त्याची सर्वोत्तम कामगिरी २५ धावांत सहा विकेट्स ही आहे.

IND vs ZIM : भारताविरुद्ध झिम्बाब्वेची टीम तयार! T20 मालिकेसाठी संघ जाहीर, 3 खेळाडूंना डच्चू; अनुभवी खेळाडूची एन्ट्री

Web Title: Kuldeep yadav joins yorkshire county championship team india cricket news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • County Championship
  • England cricket
  • Kuldeep Yadav

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.