Kuldeep-Vanshika: Kuldeep Yadav out on childhood friend's spin! He secretly married Vanshika before going to England..
Kuldeep Yadav and Vanshika marriage : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादव त्याच्या बालपणीची मैत्रिण वंशिकाच्या फिरकीवर आऊट झाला आहे. इंग्लंडला दौऱ्यावर जाण्यापूर्वी या दोघांनी गपचूप लग्न आटोपले आहे. हा लग्न समारंभ लखनौमध्ये पारंपारिक पद्धतीने पार पडला आहे. क्रिकेट आणि इतर क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती देखील या विवाह सोहळ्याला उपस्थित होत्या.
कानपूरची रहिवासी असणारी वंशिका एलआयसीमध्ये काम करते. अशी माहिती समोर आली आहे की, कुलदीप आणि वंशिका एकमेकांना खूप काळापासून ओळखतात आणि त्यांची चांगली मैत्री होती. ती मैत्री आता एका नवीन नात्यात रूपांतरित झाली आहे. या कुलदीप यादवच्या आयुष्यातील या खास प्रसंगी भारतीय संघाचा युवा फलंदाज रिंकू सिंगसह अनेक क्रिकेटपटू उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. या खेळाडूंकडून या नवीन सुरुवातीसाठी या जोडप्याला शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले आहे.
हेही वाचा : RCB IPL winning rally : RCB च्या विजयी रॅलीत अनर्थ: गर्दीचा ताबा सुटून चेंगराचेंगरीत ७ जणांचा मृत्यू..
कुलदीप आणि वांशिकाचा लग्न समारंभ अतिशय खाजगी ठेवण्यात आला होता, परंतु त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल झाले आहेत. आता चाहत्यांकडून कुलदीपवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की कुलदीप यादव हा भारतीय संघातील महत्त्वाचा गोलंदाजांपैकी एक आहे. अलिकडेच त्याने अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये भारतासाठी चमकदार कामगिरी केली आहे. आता त्याने आपल्या वैयक्तिक जीवनात नवीन इनिंगला सुरवात केलीय आहे.
आरसीबी संघ १८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आयपीएल विजेता ठरला आहे. आरसीबीने पंजाबला ६ धावांनी पराभूत करत इतिहास रचला आहे. आयपीएल २०२५ चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. पंजाबने नानेफक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने १९० धावा केल्या होत्या. आरसीबीकडून विराट कोहली (४३), रजत पाटीदार (२६), लियाम लिव्हिंगस्टोन (२५) आणि जितेश शर्मा (२४) यांनी महत्वाची भूमिका बजावली. प्रत्युउत्तरात पंजाबचा संघ १८४ धावाच करू शकला. आरसीबीच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत पंजाबला विजयापासून रोखले. पीबीकेएसकडून शशांक सिंगने ३० चेंडूत ६१ धावांची तुफानी खेळी केली, परंतु तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.