फोटो सौजन्य – X
भारताच्या संघाला तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडीया काही खेळाडूंना बाहेर करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. भारताच्या संघासाठी हा सामना फारच महत्वाचा असणार आहे. टीम इंडीयाला या सामन्यात विजय मिळवणे किंवा ड्राॅ करणे गरजेचे आहे. भारताचा पुढील सामना हा 23 जुलैपासुन खेळवला जाणार आहे. भारताच्या फलंदाजांनी शेवटच्या इंनिगमध्ये फारच निराशाजनक कामगिरी केली. भारताच्या प्लेइंग ११ मध्ये टीम इंडीया चौथ्या सामन्यामध्ये कोणते बदल करणार हे तर वेळ आल्यावरच कळेल.
भारतीय संघामध्ये असे काही खेळाडू आहेत ज्यांना आतापर्यत झालेल्या तीनही सामन्यामध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. यामध्ये कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, अभिमन्यु ईश्वरन यांना झालेल्या एकही सामन्यात खेळता आले नाही. करुन नायर याने झालेल्या एकही सामन्यामध्ये 40 चा आकडा पार केला नाही, त्याचबरोबर नितिश कुमार रेड्डीने फलंदाजीमध्ये तर फार काही चांगली कामगिरी केली नाही पण त्याने गोलंदाजीमध्ये चांगला खेळ दाखवला आहे. आता कुलदीप यादवला प्लेइंग ११ मध्ये संधी न मिळाल्यामुळे बालपणीच्या प्रशिक्षकाचे मोठे विधान समोर आले आहे.
Will Abhimanyu Easwaran & Arshdeep Singh make their debut or Kuldeep Yadav will make his Test return? 🤍🏏
Which one are you backing for the 4th Test? 🤔🇮🇳#ENGvIND #Tests #India #Sportskeeda pic.twitter.com/hBwr2QArUz
— Sportskeeda (@Sportskeeda) July 16, 2025
टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या कसोटी मालिकेसाठी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचाही संघात समावेश करण्यात आला आहे, परंतु आतापर्यंत या गोलंदाजाला या मालिकेत एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही. आतापर्यंत मालिकेतील ३ सामने खेळले गेले आहेत. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे फिरकी गोलंदाज म्हणून खेळताना दिसले आहेत.
आता कुलदीप यादवचे बालपणीचे प्रशिक्षक कपिल देव पांडे यांनी सांगितले आहे की कुलदीपला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी का मिळत नाही? कपिल देव पांडे म्हणाले, “कुलदीपचे खेळणे देशाच्या विजयाइतके महत्त्वाचे नाही. सुरुवातीला असे वाटले होते की कुलदीपला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल, परंतु वेगवान गोलंदाजांची कामगिरी चांगली होती. म्हणूनच कुलदीपला अद्याप संधी मिळालेली नाही.”
कुलदीपचे कोच कपिल देव पांडे यांनी त्याच्या तयारीवर पुर्ण विश्वास दाखवला आहे, त्याने आयपीएल 2025 मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. त्याचबरोबर त्याला कसोटी क्रिकेटमध्ये देखील फार काही संधी मिळाली नाही. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यत 13 सामने खेळले आहेत यामध्ये त्याने 56 विकेट्स घेतले आहे.