Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांगलादेशविरुद्ध इम्पॅक्ट प्लेअर पुरस्कारावर ‘या’ खेळाडुने कोरले नाव! BCCI कडून व्हिडिओ शेअर 

आशिया कपमध्ये सुपर ४ सामन्यात भारताने बांगलादेशचा ४१ धावांनी पराभव केला. या सामन्यात ३ विकेट घेणाऱ्या कुलदीप यादवला इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 25, 2025 | 06:33 PM
'This' player wins Impact Player Award against Bangladesh! BCCI shares video

'This' player wins Impact Player Award against Bangladesh! BCCI shares video

Follow Us
Close
Follow Us:

Team India’s Impact Player Medal : आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. काल २४ सप्टेंबर रोजी झालेल्या सुपर ४ सामन्यात भारताने बांगलादेशचा ४१ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने आशिया कपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. या विजयात अनेक खेळाडूंनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या सामन्यात अर्धशतक झळकवणाऱ्या अभिषेक शर्माला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तर बीसीसीआयने कुलदीप यादवला विशेष पुरस्कार देण्यात आला आहे.

कुलदीप यादवने बांगलादेशविरुद्ध ४ षटकांत १८ धावा देत ३ विकेट्स घेऊन दमदार कामगिरी केली. कुलदीपच्या कामगिरीमुळे भारतीय संघाचा विजय सोपा झाला. कुलदीपची त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.  कामगिरी विश्लेषक हरी मोहन प्रसाद यांच्याकडून कुलदीपला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हेही वाचा : Asia cup 2025 : अंतिम सामन्यात IND-PAK यांच्यात रंगणार थरार! ‘हे’ समीकरण घडवणार महामुकाबला…

बीसीसीआयनकडून व्हिडिओ शेअर

बीसीसीआयकडून सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये, विश्लेषकाकडून डावखुरा मनगट फिरकी गोलंदाज त्याच्या व्हेरिएशनने प्रतिस्पर्ध्यांना त्रास दिल्याबद्दल त्याचे कौतुक करण्यात आले. मोहन म्हणाले की, इम्पॅक्ट प्लेअर पुरस्कार चेंडूने असाधारणपणे चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला देण्यात येतो. आजच्या टी-२० क्रिकेटमध्ये, स्पिन, ड्रिफ्ट आणि डिपचे कौशल्य इतके सातत्यपूर्णपणे दाखवणारे फारच कमी खेळाडू दिसतात. म्हणूनच, हा पुरस्कार कुलदीप यादवकडे जातो.

 आशिया कपमध्ये कुलदीप सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज

कुलदीप यादव आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे (एकदिवसीय आणि टी-२० दोन्ही एकत्रित). २०२५ च्या आशिया कपमध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजाचा विक्रम (२९ विकेट) मोडण्यासाठी त्याला फक्त दोन विकेट गरजेच्या होत्या.  कुलदीपने परवेझ हुसेन इमोन आणि रियाद हुसेनला बाद करून हा विक्रम प्रस्थापित केला.

हेही वाचा : रविचंद्रन अश्विनचा नवा पराक्रम! ‘या’ परदेशी लीगमध्ये खेळणारा ठरला पहिलाच भारतीय खेळाडू

सामन्याची स्थिती

नाणेफेक गमावणाऱ्या  भारताने प्रथम फलंदाजी करत ६ विकेट गमावून १६८ धावा केल्या. भारताकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक ७५ धावा केल्या. तर हार्दिक पंड्याने ३८ आणि शुभमन गिलने २९ धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरादाखल लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशचा संघ १२७ धावांवरच सर्वबाद झाला. परिणामी भारताने ४१ धावांनी सामना जिंकला. भारताकडून कुलदीप यादवने तीन विकेट्स घेतल्या.

Web Title: Kuldeep yadav wins impact player award against bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 06:33 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • bcci
  • IND VS BAN
  • Kuldeep Yadav

संबंधित बातम्या

रविचंद्रन अश्विनचा नवा पराक्रम! ‘या’ परदेशी लीगमध्ये खेळणारा ठरला पहिलाच भारतीय खेळाडू
1

रविचंद्रन अश्विनचा नवा पराक्रम! ‘या’ परदेशी लीगमध्ये खेळणारा ठरला पहिलाच भारतीय खेळाडू

Asia cup 2025 : अंतिम सामन्यात IND-PAK यांच्यात रंगणार थरार! ‘हे’ समीकरण घडवणार महामुकाबला…
2

Asia cup 2025 : अंतिम सामन्यात IND-PAK यांच्यात रंगणार थरार! ‘हे’ समीकरण घडवणार महामुकाबला…

IND vs BAN : चल्याने दिला गुरु युवराज सिंगला धोबी पछाड! अभिषेक शर्माच्या रडारवर हिटमॅन शर्माचा विक्रम 
3

IND vs BAN : चल्याने दिला गुरु युवराज सिंगला धोबी पछाड! अभिषेक शर्माच्या रडारवर हिटमॅन शर्माचा विक्रम 

Shreyas Iyer चा  रेड बॉल क्रिकेटमधून ब्रेक! BCCI ने सोडले मौन,  केला मोठा खुलासा… 
4

Shreyas Iyer चा  रेड बॉल क्रिकेटमधून ब्रेक! BCCI ने सोडले मौन,  केला मोठा खुलासा… 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.