ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-२० विश्वचषकात काल पारपडलेल्या भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात बांगलादेश संघाचा ५ धावांनी पराभव झाला. सामन्यात पावसाच्या आलेल्या व्यत्ययामुळे सामना काहीसा बांग्लादेशकडे झुकताना दिसत असतानाच के एल राहुलने केलेल्या जबरदस्त रन आउटमुळे सामन्याला कलाटणी मिळाली. तसेच बऱ्याच दिवसापासून फलंदाजीत फ्लॉप ठरलेल्या के एल राहुलने काल फलंदाजीतही कमाल दाखवली. मात्र अचानक फॉर्म मध्ये आलेल्या के एल राहुलच्या यशा मागचं कारण हे त्याची गर्ल फ्रेंड अभिनेत्री अथिया शेट्टी ही असल्याचे बोलले जात आहे.
यंदाच्या टी २० वर्ल्ड कप मध्ये अपयशी ठरत असल्याने केएल राहुलवर टीका सुरु होती. मागच्या तीन सामन्यात तो फेल गेला होता. त्यामुळे केएल राहुलला बाहेर काढा अशी मागणी क्रिकेटप्रेमी करत होते. मात्र, राहुललने रोहित शर्माचा विश्वास सार्थ ठरवला. त्याने बांग्लादेश विरुद्ध ३१ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याची ही खेळी पाहता क्रिकेट जगतात अभिनेत्री अथिया शेट्टीच्या पायगुणाच्या चर्चा रंगली आहे. भारत विरुद्ध बांग्लादेश हा सामना डिलेड मैदानावर खेळवण्यात आला होता. हा सामना पाहण्यासाठी केएल राहुलची गर्ल फ्रेंड अभिनेत्री अथिया शेट्टी ही देखील उपस्थित होती.
केएल राहुल आणि अथिया शेट्टी हे एकमेकांना डेट करीत असून लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा देखील रंगत आहेत. अनेकवेळा अथिया मैदानावर केएल राहुलला सपोर्ट करण्यासाठी उपस्थिती दर्शवते. राहुलने अर्धशतक झळकावताच अथिया शेट्टीने आपल्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. इतकेच नव्हे तर तिने के एल राहुलला टॅग तर हर्टचा इमोजीदेखील शेअर केला.