
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
अर्जेंटिनाचा सुपरस्टार लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर आला आहे, त्याचे अनेक व्हिडिओ काही क्षणातच सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. भारतीय फुटबॉल चाहते मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी मागील अनेक महिन्यांपासून उत्सुक होते. मेस्सी तीन दिवसांसाठी भारत दौऱ्यावर आहे. त्याच्या दौऱ्याला ‘GOAT इंडिया टूर’ असे नाव देण्यात आले आहे. मेस्सी १३ ते १५ डिसेंबर दरम्यान भारतात असेल आणि या काळात तो कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली या चार वेगवेगळ्या शहरांना भेट देणार आहे.
या दौऱ्यादरम्यान, मेस्सी पंतप्रधान नरेंद्र मोदी, बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि देशातील अनेक मुख्यमंत्र्यांसह अनेक प्रमुख व्यक्तींना भेटेल. शिवाय, त्याचा माजी सहकारी आणि सुपरस्टार फुटबॉलपटू लुईस सुआरेझ आणि विश्वचषक विजेता रॉड्रिगो डी पॉल देखील या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. तर, मेस्सीच्या भारत दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक तुम्हाला देत आहोत. २०११ नंतर पहिल्यांदाच लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर येणार आहे.
अमेरिकेतील मियामीहून येत असलेला मेस्सी आपला प्रवास व्यवस्थित करण्यासाठी दुबईमध्ये थोडा वेळ थांबला होता आणि त्यानंतर १३ डिसेंबर, शनिवारी पहाटे १:३० वाजता कोलकाता येथे पोहोचेला आहे. तेथून तो त्याच दिवशी हैदराबादला जाईल. १४ डिसेंबर रोजी तो मुंबईत असेल आणि १५ डिसेंबर रोजी दिल्लीत त्याचा दौरा संपेल. मेस्सी हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये एक मैत्रीपूर्ण सामना देखील खेळेल, ज्यामध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी देखील सहभागी होतील. संध्याकाळी मेस्सीसोबत एक संगीतमय मैफिलीचेही नियोजन आहे.
मेस्सी इंडिया टूरची तिकिटे झोमॅटोच्या डिस्ट्रिक्ट अॅपवर उपलब्ध आहेत, जिथे तुम्ही तुमच्या शहरातील कार्यक्रमाची तिकिटे खरेदी करू शकता. बहुतेक शहरांमध्ये तिकिटांची किंमत सुमारे ₹४,५०० आहे, तर मुंबईत तिकिटांची किंमत ₹८,२५० पासून सुरू आहेत.
| तारिख | ठिकाण | वेळ | कार्यक्रम |
|---|---|---|---|
| 13 डिसेंबर | कोलकता | सकाळी ९:३०–१०:३० | चाहत्यांशी भेट आणि अभिवादन |
| सकाळी १०:३०–११:१५ | मेस्सीच्या पुतळ्याचे अनावरण | ||
| सकाळी ११:१५–११:२५ | युवा भारती स्टेडियममध्ये | ||
| सकाळी ११:३० वाजता | शाहरुख खानचे युवा भारती येथे आगमन | ||
| दुपारी १२:००–१२:३० | मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना | ||
| दुपारी २:०० वाजता | हैदराबादसाठी प्रस्थान | ||
| ३ डिसेंबर | हैदराबाद | संध्याकाळी ७:०० वाजता | मेस्सी विरुद्ध रेवंत रेड्डी मैत्रीपूर्ण सामना (राजीव गांधी स्टेडियम) |
| संगीतमय मैफल आणि उत्सव रात्र | |||
| 14 डिसेंबर | मुंबई | दुपारी ३:३० वाजता | सीसीआयमधील पॅडल कपमध्ये सहभाग |
| दुपारी ४:०० वाजता | सेलिब्रिटी फुटबॉल सामना | ||
| संध्याकाळी ५:०० वाजता | वानखेडे स्टेडियमवरील कार्यक्रम + चॅरिटी फॅशन शो | ||
| १५ डिसेंबर | नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट | |
| दुपारी १:३० वाजता | अरुण जेटली स्टेडियममधील कार्यक्रम | ||
| अर्जंटिनाला रवाना होणार |