फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Argentine star Lionel Messi arrives in India : फुटबॉलचा जादूगार म्हणून ओळखला जाणारा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी अखेर भारतात आला आहे. मेस्सीच्या भारतात येण्याची वाट पाहणारे चाहते बऱ्याच काळापासून त्यांच्या स्टार खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी विमानतळावर मोठ्या संख्येने गर्दी करत होते. लिओनेल मेस्सी त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मागील अनेक महिन्यांपासून लिओनेल मेस्सी भारतामध्ये येणार असे वृत समोर येत होत. अनेकदा तो येणार नाही त्याचा दौरा कॅन्सल झाला असे देखील सोशल मिडियावर दावा केला जात होता.
पण तो आता भारतामध्ये आला आहे आणि त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. मेस्सी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे, ज्यामध्ये तो चार राज्यांचा समावेश करेल. अर्जेंटिनाला २०२२ च्या फिफा विश्वचषकात नेणारा मेस्सी प्रथम कोलकाता येथे पोहोचेल. तो प्रथम त्याच्या चाहत्यांना भेटेल आणि नंतर त्याच्या ७० फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण करेल.
अर्जेंटिनाचा स्टार लिओनेल मेस्सी भारतात आगमन
अर्जेंटिनाचा स्टार लिओनेल मेस्सी भारतात आला आहे. त्याला पाहण्यासाठी कोलकाता विमानतळावर चाहत्यांची गर्दी जमली होती. कोलकाता येथे आगमन होताच मेस्सीचे जोरदार स्वागत करण्यात आले. चाहत्यांच्या उत्साहामुळे फुटबॉल दिग्गज खूपच आनंदी दिसत होता.कडक सुरक्षा आणि वाहनांच्या ताफ्यात मेस्सी विमानतळावरून निघाला. विमानतळावर चाहते मेस्सीच्या नावाचा जयघोष करताना दिसले. त्याचा ऐतिहासिक दौरा कॅमेऱ्यात टिपण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक दिसत होता.
THE CRAZE FOR LIONEL MESSI IN KOLKATA WHEN HE ARRIVED AT MID NIGHT. 🔥🥶 – The Craze of Lionel Messi..!!!! pic.twitter.com/cpfZQbPFx7 — Tanuj (@ImTanujSingh) December 13, 2025
लिओनेल मेस्सी प्रथम भेट-अभिवादन कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर ते त्यांच्या ७० फूट उंच पुतळ्याचे अनावरण करतील. कोलकात्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अग्निशमन मंत्री सुजित बोस, बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली हे देखील साल्ट लेक स्टेडियममध्ये मेस्सीच्या स्वागत समारंभात उपस्थित राहतील. कार्यक्रमादरम्यान मेस्सीच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जाईल. मेस्सी एक मैत्रीपूर्ण सामना देखील खेळेल. त्यानंतर, फुटबॉल स्टार हैदराबादला रवाना होईल. त्याच्या दौऱ्यादरम्यान, मेस्सी मुंबईला देखील भेट देईल, जिथे तो वानखेडे स्टेडियममध्ये एका विशेष कार्यक्रमात सहभागी होईल.






