Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LSG vs CSK: लखनऊच्या मैदानावर गोलंदाज की फलंदाज कोण करणार कमाल? वाचा पिच रिपोर्ट

LSG vs CSK Pitch Report: लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नऊ सुपर किंग्स यांच्यात आज महत्वाचा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याची, पिच रिपोर्ट आणि संभाव्य प्लेइंग ११ कशी असेल, जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 15, 2026 | 03:03 PM
LSG vs CSK: लखनऊच्या मैदानावर गोलंदाज की फलंदाज कोण करणार कमाल? वाचा पिच रिपोर्ट
Follow Us
Follow Us:
  • LSG vs CSK पिच रिपोर्ट
  • हेड टू हेड रिकॉर्ड
  • संभाव्य प्लेइंग ११
चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आज आयपीएल २०२६ चा ५९ वा साखळी सामना खेळला जाणार आहे. लखनऊ येथील (BRSABV Ekana Cricket Stadium) भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता हा सामना खेळला जाईल. तर, दोन्ही कर्णधार ऋषभ पंत आणि ऋतुराज गायकवाड अर्धा तास आधी, म्हणजेच संध्याकाळी ७ वाजता नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील. प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेला लखनऊचा संघ आज बिनधास्त खेळेल. परंतु, सर्वांचे लक्ष चेन्नई संघावर असेल. आजचा सामना जिंकून सीएसके प्लेऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात, संभाव्य प्लेइंग ११ आणि पिच रिपोर्ट कशी असेल, जाणून घेऊयात.

‘ओए अंधेरे…’ अर्शदीपने केली तिलकवर रंगावरून टिप्पणी, व्हायरल व्हिडिओने चाहत्यांचा तिळपापड; तिलकने दिले बॅटिंगने उत्तर

LSG vs CSK पिच रिपोर्ट

लखनऊ विरुद्ध चेन्नई सामना एकाना स्टेडियममधील पिच क्रमांक ४ वर खेळला जाईल. ही पिच लो स्कोअरिंग पिच आहे. म्हणजेच, ही पिच संथ आहे. ज्यामुळे फलंदाजांसाठी फलंदाजी करणे तितके सोपे असणार नाही. या पिचवर लखनऊने ११९, आणि १४१ धावा केल्या असून दोन्ही सामन्यांमध्ये संघाला पराभव पत्करावा लागला आहे. या पिचवर ३० पैकी २३ विकेट्स वेगवान गोलंदाजांनी घेतले आहेत. तर, फिरकी गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट वेगवान गोलंदाजांपेक्षा जास्त राहिला आहे त्यामुळे, दोन्ही संघ अतिरिक्त वेगवान गोलंदाज मैदानात उतरवू शकतात. या स्टेडियमवर नाणेफेक महत्वाची भूमिका बजावू शकतो, कारण नाणेफेक जिंकणाऱ्या संघानी २७ पैकी १६ सामने जिंकले आहेत. तसेच, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानी १२ सामने जिंकले आहेत. तर, लक्ष्याचा पाठलाग करताना १४ सामने जिंकले आहेत. या पिचवर सर्वाधिक धावसंख्या २३५/६ तर सर्वात कमी धावसंख्या १०८ इतकी आहे.

हेड टू हेड रिकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात एलएसजी LSG विरुद्ध सीएसके CSK यांच्यात एकूण सात सामने खेळले गेले आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन सामने जिंकले असून एक सामना अनिर्णित राहिला आहे. यामुळे दोन्ही संघांमध्ये एक चुरशीची स्पर्धा होऊ शकते. परंतु, सध्याचा फॉर्म पाहता, चेन्नई सुपर किंग्सचे पारडे जड दिसत आहे.

LSG संभाव्य प्लेइंग ११-
जोश इंग्लिस, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), एडन मार्करम, अक्षत रघुवंशी, शाहबाज अहमद, हिम्मत सिंग, मोहम्मद शमी, आवेश खान, प्रिन्स यादव, मोहसीन खान.

CSK संभाव्य प्लेइंग ११-
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, प्रशांत वीर, अकील हुसेन, अंशुल कंबोज, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद, मुकेश चौधरी.

Tilak Varma celebration: रोहित शर्मासाठी ‘जिंकून घेतलं सारं…’, चाहते झाले भावूक; तिलक वर्माचा Secret Message

Web Title: Lsg vs csk pitch report playing 11 head to head ipl 2026 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • IPL 2026
  • Lucknow Super Giants

संबंधित बातम्या

फाटलं! लखनौचा संघ सोडताच Rishabh Pant ची पोस्ट व्हायरल; केवळ 3 शब्दांमध्ये दिली प्रतिक्रिया
1

फाटलं! लखनौचा संघ सोडताच Rishabh Pant ची पोस्ट व्हायरल; केवळ 3 शब्दांमध्ये दिली प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.