LSG vs CSK: Only Dhoni can do this..! 'Thala Magic' returns LSG batsman to a wide ball.., watch video
LSG vs CSK : आयपीएल 2025 मधील 30 वा सामना काल (१४ एप्रिल) लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात आला आहे. एकाना स्टेडियमवर हा सामना पार पडला असून यामध्ये सीएसके एलएसजीला धूळ चारली. लागोपाठ 5 सामन्यात पराभव पत्करणाऱ्या धोनी आर्मीला विजयाची चव चाखता आली आहे. चेन्नईने लखनौला 5 विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात लखनौचा कर्णधार रिषभ पंतने अर्धशतक झळकावले खरे परंतु, तो आपल्या संघाला विजयापर्यत पोहचवू शकला नाही. हा सामना खूप रंजक झाला आहे. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने चाहत्यांचे चांगले मनोरंजन केले आहे. लखनौविरुद्धही धोनीने आपली जादू पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.
महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेट जगतात त्याच्या उत्कृष्ट स्टंपिंगसाठी ओळखला जातो. त्याच्याकडे नेहमी विकेटच्या मागून सामना बदलण्याची क्षमता असते. त्याच्या उत्तम रणनीतीचा अनेकदा संघाला फायदाही होत असतो. लखनौविरुद्धच्या सामन्यात देखील असेच काही बघायला मिळाले आहे. या सामन्यात त्याने आपली माही जादू पुन्हा एकदा दाखवली आहे. या सामन्यात त्याने वाईड बॉलवर देखील विकेट घेऊन दाखवली आहे.
हेही वाचा : Indian Hockey Team : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ जाहीर; पाच नव्या चेहऱ्यांना संधी
खरं तर, धोनीची स्टंपला हिट मारण्याची पद्धत नेहमीच कौशल्यपूर्ण राहिली आहे. मग तो एखाद्याला स्टंप करत असो किंवा एखाद्याला धावबाद करत असो. या सामन्यात दोन्ही गोष्टी दिसून आल्या. प्रथम त्याने आयुष बदोनीच्या यष्टींना हिट केले, त्यानंतर त्याने अब्दुल समदला धावबाद करून संघाला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे त्याने ही विकेट वाइड बॉलवर घेतली आहे.
चेन्नईचा ४३ वर्षीय कर्णधार धोनीने लखनौविरुद्धही एक इतिहास रचला आहे. त्याने आयुष बदोनीला शानदार स्टंपिंग करून तंबूत पाठवले आहे. असे करून त्याने आयपीएलमध्ये त्याचे २०० बळी पूर्ण केले आहेत. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू बनला आहे.
Still got it 💪 pic.twitter.com/dWCDZppUta
— DHONI GIFS™ (@DhoniGifs) April 14, 2025
हेही वाचा : MI vs DC : ‘चेंडू बदलल्याने संघाला फायदा..’, दिल्लीच्या फलंदाजीला सुरुंग लावणाऱ्या कर्ण शर्माचे प्रतिपादन
चेन्नईचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे आयपीएल बाहेर पडला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनीच्या हातात आले आहे.
चेन्नई सुपर किंग्ज : शेख रशीद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, रवींद्र जडेजा, जेमी ओव्हरटन, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार, यष्टिरक्षक), अंशुल कंबोज, नूर अहमद, खलील अहमद, मथिशा पाथिराना.
लखनौ सुपर किंग्ज : एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (कर्णधार, यष्टिरक्षक), डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आवेश खान, आकाश दीप, दिग्विजय सिंग राठी.