ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ जाहीर(फोटो-सोशल मिडिया)
दिल्ली : हॉकी इंडियाने सोमवारी २६ एप्रिल ते ४ मे या कालावधीत होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी २६ सदस्यीय महिला संघाची घोषणा केली. ज्यामध्ये पाच नवीन खेळाडूंनी वरिष्ठ संघात पदार्पण केले आहे. या दौऱ्यात भारत एकूण पाच सामने खेळेल. पहिल्या दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया अ संघाचा सामना करावा लागणार आहे. त्यानंतर महिला संघ वरिष्ठ ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध तीन सामने खेळणार आहे. यातील सर्व पाचही सामने हे पर्थ हॉकी स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. जूनमध्ये होणाऱ्या एफआयएच प्रो लीग २०२४-२५ च्या युरोपियन लेगसाठी संघ तयारी करत असताना हा दौरा महत्त्वाचा ठरणार असल्याचे बोलले आजात आहेत. ज्योती सिंग, सुजाता कुजूर, अजमिना कुजूर, पूजा यादव आणि महिमा टेटे या पाच खेळाडूंना पहिल्यांदाच भारतीय हॉकीच्या वरिष्ठ संघात स्थान देण्यात आले आहे.
हेही वाचा : PBKS vs KKR : आज कोलकाता करणार पंजाबसोबत दोन हात, अय्यरसेना सज्ज तर अजिंक्य सेनेनेही भरला हुंकार..
संघात संघात अनुभवी आणि नवीन खेळाडूंचे मिश्रण आहे. संघाचे नेतृत्व मिडफिल्डर सलीमा टेटे करणार आहे, तर अनुभवी फॉरवर्ड नवनीत कौरला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अनुभवी सविता आणि तरुण बिचू देवी खरीबम गोलकीपरची जबाबदारी सांभाळतील तर डिफेन्स लाईनमध्ये ज्योती सिंग, इशिका चौधरी, सुशीला चानू पुक्रंबम, सुजाता कुजूर, सुमन देवी थौडम, ज्योती, अजमिना कुजूर आणि साक्षी राणा यांचा समावेश आहे. मधल्या फळीची जबाबदारी कर्णधार टेटे, वैष्णवी विठ्ठल फाळके, नेहा, शर्मिला देवी, मनीषा चौहान, सुनीलिता टोप्पो, महिमा टेटे, पूजा यादव आणि लालरेमसियामी यांच्यावर असेल. नवनीत कौर, दीपिका, रुताजा दादासो पिसाल, मुमताज खान, बलजीत कौर, दीपिका सोरेंग आणि ब्युटी डुंगडुंग आघाडीच्या फळीची जबाबदारी सांभाळणार आहेत.
हेही वाचा : CSK Vs LSG: एकाना स्टेडियमवर धोनीचा बोलबाला; लखनौचा 5 विकेट्सने केला दणदणीत पराभव…
संतुलित संघ निवडला : हरेंद्र सिंह
बंसारी सोलंकी (गोलकीपर), अंजना दुइंग आणि लालथंतुआंगी (बचावपटू), साक्षी शुक्ला आणि खैदेम शिलेमा चानू (मध्य) आणि मोनिका टोप्पो आणि सोनम (फॉरवर्ड) यांची स्टैंडबाय खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंह म्हणाले, आम्ही एक संतुलित संघाची निवड करण्यात आली आहे. जो अनुभवी आणि तरुणांचे चांगले मिश्रण आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि वरिष्ठ शिबिरांमध्ये युवा खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवले आहे. तो आंतरराष्ट्रीय स्तरावरील आव्हानाला कसे तोंड देतो हे पाहणे आता मनोरंजक असेल.