Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kho Kho Championship : महाराष्ट्राच्या खो-खोपटूंचा मैदानावर धुमाकूळ; आंध्र, हिमाचलला लोळवले

Kho Kho Championship : 45 व्या ज्युनिअर राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुला-मुलींची विजयी सलामी. मुलींनी आंध्र प्रदेशचा 18 गुणांनी, तर मुलांनी हिमाचल प्रदेशचा 20 गुणांनी पराभव केला.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 22, 2026 | 09:01 PM
Kho Kho Championship : महाराष्ट्राच्या खो-खोपटूंचा मैदानावर धुमाकूळ; आंध्र, हिमाचलला लोळवले

Kho Kho Championship : महाराष्ट्राच्या खो-खोपटूंचा मैदानावर धुमाकूळ; आंध्र, हिमाचलला लोळवले

Follow Us
Follow Us:
  • दोन्ही संघांचा एक डाव राखून विजय
  • श्वेता नवलेची 10 गुणांची आतषबाजी
  • ताबरेज खाननेही पटकावले 10 गुण
 

Kho Kho Championship : राष्ट्रीय खो-खोच्या मैदानावर महाराष्ट्राच्या मुला-मुलींनी एकाच दिवशी विजयाचा दुहेरी धमाका केला. पारुल विद्यापीठ, गुजरात येथे सुरू असलेल्या 45 व्या ज्युनिअर राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी साखळी सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांना निष्प्रभ करत दिमाखदार विजय नोंदवले.
मुलींच्या संघाने आंध्र प्रदेशचा 30-12 असा 18 गुणांनी, तर मुलांच्या संघाने हिमाचल प्रदेशचा 38-18 असा 20 गुणांनी धुव्वा उडवला. विशेष म्हणजे, दोन्ही संघांनी एक डाव राखून विजय मिळवत राष्ट्रीय स्पर्धेतील आपली ताकद दाखवून दिली.

 

श्वेता नवलेची 10 गुणांची आतषबाजी

मुलींच्या ‘अ’ गटातील सामन्यात महाराष्ट्राने आंध्र प्रदेशचा 30-12 असा एक डाव आणि 18 गुणांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षणाचा निर्णय घेतलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व गाजवले. आक्रमण आणि संरक्षण या दोन्ही आघाड्यांवर प्रभावी कामगिरी करत महाराष्ट्राने प्रतिस्पर्ध्याला वरचढ होण्याची संधीच दिली नाही.

महाराष्ट्राच्या विजयात श्वेता नवलेने 1 मिनिट 30 सेकंद नाबाद संरक्षणासह तब्बल 10 गुणांची कमाई करत निर्णायक भूमिका बजावली. धनश्री कंकने 3 मिनिटे 10 सेकंद संरक्षण आणि चार गुण, तर मैथिली पवारने 3 मिनिटे 10 सेकंद संरक्षण व दोन गुण मिळवत विजयाला भक्कम आधार दिला. वेदिका तामखडेने 2 मिनिटे 20 सेकंद संरक्षण, स्नेहा लामकानेने चार गुण, तर नंदिनी सिसोदियाने दोन गुण मिळवत संघाच्या विजयात मोलाची भर घातली.

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी संरक्षणात तब्बल आठ बोनस गुण (ड्रीम रन) मिळवत आपली क्षमता सिद्ध केली. आंध्र प्रदेशकडून एम. डी. लक्ष्मी, एम. वाय. श्री, नेक्कलापुडी आणि ताडिथला प्रिया यांनी प्रत्येकी दोन गुण मिळवले; मात्र महाराष्ट्राच्या एकत्रित खेळापुढे त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले.

Sport News: जिल्हास्तरीय टेनिकोईट स्पर्धेत माणगंगा स्कूलच्या मुलींचा डंका! दोन्ही संघांची विभागीय स्तरावर निवड

ताबरेज खाननेही पटकावले 10 गुण

मुलांच्या ‘ब’ गटातील सामन्यात महाराष्ट्राच्या संघाने हिमाचल प्रदेशवर 38-18 असा एक डाव आणि 20 गुणांनी दणदणीत विजय मिळवला. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आक्रमणात सातत्यपूर्ण गुणांची कमाई करत सामन्याची सूत्रे आपल्या हाती ठेवली.

वैयक्तिक चमकदार कामगिरीसोबतच सांघिक समन्वयाच्या जोरावर महाराष्ट्राने एकतर्फी विजय साकारला. महाराष्ट्राकडून ताबरेज खानने सर्वाधिक 10 गुण मिळवत आक्रमणात धडाका उडवला. हरदाय वसावेने 2 मिनिटे 30 सेकंद संरक्षण आणि 6 गुण, तर जितेंद्र वसावेने 2 मिनिटे 50 सेकंद व दोन मिनिटे संरक्षणासह 4 गुण मिळवत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

पार्थ देवकतेने दोन मिनिटे संरक्षण व दोन गुण, तर समर्थ चव्हाणने एक मिनिट संरक्षण करत संघाला मोलाची साथ दिली. हिमाचल प्रदेशकडून राजीव ठाकूर आणि अरक्षित शर्मा यांनी प्रत्येकी सहा गुण, तर नमन धिमानने दोन गुण मिळवले. मात्र महाराष्ट्राच्या आक्रमक खेळासमोर हिमाचल प्रदेशचा प्रतिकार टिकू कला नाही.

Elite Sports Management : आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांचा मुंबईत गौरव; ‘हार्ट ऑफ गोल्ड’ सोहळ्यात खेळाडूंच्या संघर्षाला सल

💡

Frequently Asked Questions

  • Que: 45 वी ज्युनिअर राष्ट्रीय खो-खो स्पर्धा कुठे सुरू आहे?

    Ans: ही स्पर्धा गुजरातमधील पारुल विद्यापीठ येथे सुरू आहे.

  • Que: महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने कोणाचा पराभव केला?

    Ans: महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने आंध्र प्रदेशचा 30-12 असा 18 गुणांनी पराभव केला.

  • Que: महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने कोणाला हरवले?

    Ans: महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने हिमाचल प्रदेशचा 38-18 असा 20 गुणांनी पराभव केला.

Web Title: Maharashtra junior national kho kho championship double winning start rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 09:01 PM

Topics:  

  • Gujrat
  • Himachal Pradesh
  • Kho Kho Tournament

संबंधित बातम्या

Viral Video Fact Check : कुर्ला हल्ला प्रकरणातील आरोपींची धिंड? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय
1

Viral Video Fact Check : कुर्ला हल्ला प्रकरणातील आरोपींची धिंड? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय

Kho Kho Championship : मुंबई संघात स्थान मिळवण्यासाठी चुरस; खो-खोच्या मैदानात खेळाडूंचा कस
2

Kho Kho Championship : मुंबई संघात स्थान मिळवण्यासाठी चुरस; खो-खोच्या मैदानात खेळाडूंचा कस

Kho Kho Championship : माटुंग्यात गुरुवारपासून खो-खोचा महासंग्राम! 24 संघ भिडणार, मुंबईच्या संघात स्थान मिळवण्यासाठी चुरस
3

Kho Kho Championship : माटुंग्यात गुरुवारपासून खो-खोचा महासंग्राम! 24 संघ भिडणार, मुंबईच्या संघात स्थान मिळवण्यासाठी चुरस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.