Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाची ऐतिहासिक कामगिरी, सुवर्णपदकाला घातली गवसणी

पुरुष संघाने महाराष्ट्रास सुवर्णपदक जिंकून देत आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला. आज झालेल्या दुसऱ्या क्वॉलिफायर लढतीत महाराष्ट्र संघाने आंध्र प्रदेश संघाला ८-० होमरनने पराभूत केले. त्यानंतर झालेल्या अंतिम लढतीत महाराष्ट्र संघाने छत्तीसगड संघावर १-० होमरनने विजय नोंदवत सुवर्णपदक जिंकले. अंतिम सामन्यात गौरव चौधरी याने उत्कृष्ट पिचिंग करुन छत्तीसगड संघाच्या एकाही खेळाडूचा फटका डायमंडच्या बाहेर जाऊ दिला नाही.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 11, 2022 | 07:51 PM
सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाची ऐतिहासिक कामगिरी, सुवर्णपदकाला घातली गवसणी
Follow Us
Close
Follow Us:

गांधीनगर : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत (National Sports Competition) महाराष्ट्राच्या पुरुष सॉफ्टबॉल संघाने (men softball team) सुवर्णपदक (Gold medal) जिंकून एक नवा इतिहास घडवला. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सॉफ्टबॉल खेळाचा प्रथमच समावेश करण्यात आला होता. महाराष्ट्राच्या सॉफ्टबॉल संघांकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती आणि पुरुष संघाने महाराष्ट्रास सुवर्णपदक जिंकून देत आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला. आज झालेल्या दुसऱ्या क्वॉलिफायर लढतीत महाराष्ट्र संघाने आंध्र प्रदेश संघाला ८-० होमरनने पराभूत केले. त्यानंतर झालेल्या अंतिम लढतीत महाराष्ट्र संघाने छत्तीसगड संघावर १-० होमरनने विजय नोंदवत सुवर्णपदक जिंकले. अंतिम सामन्यात गौरव चौधरी याने उत्कृष्ट पिचिंग करुन छत्तीसगड संघाच्या एकाही खेळाडूचा फटका डायमंडच्या बाहेर जाऊ दिला नाही. कल्पेश कोल्हे, गौरव चौधरी, जयेश मोरे, धीरज बाविस्कर, प्रीतेश पाटील, सुमेध तळवेलकर, अभिषेक सेलोकर, सौरभ टोकसे, पवन गुंजाळ, प्रथमेश वाघ, चेतन महाडिक, हर्षद जळमकर, दीपक खंडारे, राजेश भट, विष्णू जाधव, टिळक, पुरके खेळाडूंनी लक्षवेधक कामगिरी केली.

दरम्यान, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथमच समावेश करण्यात आलेल्या सॉफ्टबॉल खेळात महाराष्ट्राच्या पुरुष संघाने पदार्पणातच सुवर्णपदक जिंकून एक नवा इतिहास निर्माण केला आहे. या स्पर्धेत छत्तीसगड संघाने रौप्यपदक तर आंध्र प्रदेश संघाने कांस्य पदक मिळवले. महाराष्ट्र सॉफ्टबॉल संघास प्रशिक्षक म्हणून किशोर चौधरी, पियुष आंबुलकर, मिलिंद दर्प, गुलजार शेख, संघ व्यवस्थापक संदीप लंबे, ऐश्वर्या भास्करन यांचे मार्गदर्शन लाभले आहे. अंतिम सामन्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सहसचिव डॉ. सुरजसिंग येवतीकर व सहसचिव नितीन पाटील, दर्शना पंडित, अक्षय येवले हे उपस्थित होते. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर, औरंगाबाद जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव गोकुळ तांदळे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

Web Title: Maharashtra men team win gold medal in maharashtra sports competition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2022 | 07:51 PM

Topics:  

  • gold medal
  • Gujrat
  • Maharashtra team
  • Softball

संबंधित बातम्या

Sardar Vallabhbhai Patel: जुनागड’ पाकिस्तानात विलीन करण्याचा डाव? सरदार वल्लभभाई पटेलांनी नवाबाला कु्त्र्यासारखं पळून लावलं
1

Sardar Vallabhbhai Patel: जुनागड’ पाकिस्तानात विलीन करण्याचा डाव? सरदार वल्लभभाई पटेलांनी नवाबाला कु्त्र्यासारखं पळून लावलं

Gujrat Crime: प्रेयसीवरून वाद आणि मित्रानेच केले मित्राच्या शरीराचे तुकडे; डोके, हात, पाय वेगळे केले आणि…
2

Gujrat Crime: प्रेयसीवरून वाद आणि मित्रानेच केले मित्राच्या शरीराचे तुकडे; डोके, हात, पाय वेगळे केले आणि…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.