प्रिथिका प्रदीपने जिंकले गोल्ड मेडल (फोटो- ट्विटर)
भारतीय महिला कंपाऊंड तीरंदाजी संघातून खेळताना प्रिथिकाने आपल्या अचूक निशाणा साधत देशाला गोल्ड मेडल जिंकून दिले आहे. या दैदिप्यमान यशामुळे पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. जपानमधील आयची-नागोया येथे पार पडलेल्या या स्पर्धेतील महिला कंपाऊंड तीरंदाजीच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट वर्चस्व राखल्याचे पाहायला मिळाले.
🥇एशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला तिरंदाजी संघाचा सुवर्णवेध! पिंपरी-चिंचवडची कन्या प्रिथिका प्रदीप हिने एची-नागोया एशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाजी संघासोबत सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. प्रिथिका प्रदीप, ज्योती सुरेखा वेन्नम आणि चिकिता… pic.twitter.com/hjzK7rZUEO — Hemant Rasane (@HemantNRasane) October 1, 2026
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या अंतिम लढतीत भारतीय महिला संघाने बलाढ्य चीनच्या संघाला पराभवाचा धक्का दिला. प्रिथिका प्रदीप हिने मोक्याच्या क्षणी मारलेले अचूक वेध या विजयात निर्णायक ठरले. अंतिम फेरीतील सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने गोल्ड मेडल जिंकले आहे. प्रिथिकाच्या या अभूतपूर्व यशामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील क्रीडाप्रेमींमध्ये, तसेच तिच्या निवासस्थानी आनंदाचे वातावरण पसरले आहे. तिच्या कुटुंबियांवर आणि प्रशिक्षकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्थानिक नागरिक आणि विविध क्रीडा संघटनांनी फटाक्यांची आतषबाजी व मिठाई वाटून या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला.
Asian Games 2026 : कपिल पोखरियाचा सेमिफायनलमध्ये पराभव, तरीही कांस्य पदकाची कमाई
प्रिथिका प्रदीपने गेल्या अनेक वर्षांपासून तीरंदाजी क्षेत्रात सातत्याने कठोर परिश्रम घेतले आहेत. स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक स्पर्धांमध्ये तिने आपल्या कौशल्याची छाप पाडली होती. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक पटकावल्याने तिच्या या मेहनतीचे चीज झाले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते आणि नागरिकांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.






