Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahela Jayawardene : महेला जयवर्धने दिल्ली कॅपिटल्सचे नवे क्रिकेट डायरेक्टर; WPL सह तीन लीगची जबाबदारी

Mahela Jayawardene : श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेची जीएमआर स्पोर्ट्सच्या क्रिकेट डायरेक्टरपदी नियुक्ती झाली आहे. दिल्ली कॅपिटल्ससह दुबई कॅपिटल्स आणि सदर्न ब्रेव्ह या संघांच्या क्रिकेटविषयक कामकाजाची जबाबदारी तो सांभाळणार आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 20, 2026 | 03:53 PM
Mahela Jayawardene : महेला जयवर्धने दिल्ली कॅपिटल्सचे नवे क्रिकेट डायरेक्टर; WPL सह तीन लीगची जबाबदारी

Mahela Jayawardene : महेला जयवर्धने दिल्ली कॅपिटल्सचे नवे क्रिकेट डायरेक्टर; WPL सह तीन लीगची जबाबदारी

Follow Us
Follow Us:
  • तीन स्पर्धांची असणार जयवर्धनेकडे जबाबदारी
  • दिल्ली कॅपिटल्सला पहिल्या जेतेपदाची प्रतीक्षा
  • मुंबई इंडियन्सला तीन जेतेपदे मिळवून दिली
 

Mahela Jayawardene : श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू महेला जयवर्धने याची जीएमआर स्पोर्ट्सच्या क्रिकेट डायरेक्टरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीत तो महिला प्रीमियर लीग (WPL) मधील दिल्ली कॅपिटल्स, इंटरनॅशनल लीग टी-20 (ILT20) मधील दुबई कॅपिटल्स आणि इंग्लंडमधील द हंड्रेड स्पर्धेतील सदर्न ब्रेव्ह या संघांच्या क्रिकेटविषयक कामकाजाची जबाबदारी सांभाळणार आहे.

जीएमआर स्पोर्ट्सच्या क्रिकेट संघांच्या कामकाजाला धोरणात्मक दिशा देण्याचे काम जयवर्धनेकडे असेल. क्रिकेट ऑपरेशन्स, गुणवत्तापूर्ण खेळाडूंचा शोध, खेळाडूंचा विकास आणि कामगिरी व्यवस्थापन या महत्त्वाच्या क्षेत्रांवर तो लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच प्रत्येक फ्रँचायझीचे नेतृत्व, मुख्य प्रशिक्षक आणि क्रिकेट व्यवस्थापन पथकासोबत समन्वय साधून काम करेल.

हॅम्पशायरचे क्रिकेट डायरेक्टर जाइल्स व्हाइट यांच्यासोबतही जयवर्धने काम करणार आहे. जीएमआर समूहातील विविध संघांमध्ये क्रिकेटविषयक अनुभव, कौशल्य आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण करण्यावर त्याचा भर असेल.

दिल्ली कॅपिटल्सला पहिल्या जेतेपदाची प्रतीक्षा

महिला प्रीमियर लीगच्या 2023 मध्ये सुरू झालेल्या पहिल्या हंगामापासून दिल्ली कॅपिटल्स हा स्पर्धेतील महत्त्वाचा संघ राहिला आहे. आतापर्यंत झालेल्या चारही हंगामांत दिल्लीने अंतिम फेरी गाठली; मात्र प्रत्येक वेळी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यामुळे आगामी हंगामात पहिल्यांदाच जेतेपद पटकावण्याच्या उद्देशाने जयवर्धनेची नियुक्ती दिल्लीसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

नियुक्तीनंतर जयवर्धनेने आनंद व्यक्त केला. दिल्ली कॅपिटल्सची मजबूत ओळख आणि महिला क्रिकेटच्या भविष्यासाठी असलेले संघाचे धोरणात्मक व्हिजन आपल्याला प्रभावित करत असल्याचे त्याने सांगितले. संघातील सध्याच्या गुणवत्तेला आणखी धार देणे, कामगिरीत सातत्य आणणे आणि जेतेपदासाठी सातत्याने आव्हान निर्माण करणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असेल, असेही त्याने स्पष्ट केले.

IND vs NZ: किवींचं कंबरड मोडत राहुल-जैस्वालने ३२ वर्षांचा दुष्काळ संपवला; केला ‘हा’ भलामोठा रेकॉर्ड

मुंबई इंडियन्सला तीन जेतेपदे मिळवून दिली

जयवर्धने यापूर्वी मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली मुंबई इंडियन्सने तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. याशिवाय तो मुंबई इंडियन्सचा ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मन्स म्हणूनही कार्यरत होता. विविध देशांतील लीगमध्ये सहभागी होणाऱ्या फ्रँचायझी संघांच्या क्रिकेटविषयक कामकाजाचा अनुभव त्याच्याकडे आहे.

विशेष म्हणजे, जयवर्धने यापूर्वी 2012 आणि 2013 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (सध्याची दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून खेळला होता. आता खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व केलेल्या याच फ्रँचायझीमध्ये तो नव्या भूमिकेत परतणार आहे.

IND Vs NZ: ‘त्याचे नाव सिराज म्हणून…’; कॉँग्रेस नेत्याचे ‘ते’ विधान अन् प्रकरणाला धार्मिक रंग?

जीएमआर स्पोर्ट्सचे अध्यक्ष आणि दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक किरण कुमार गांधी यांनी या नियुक्तीचे स्वागत केले. जयवर्धनेचा आंतरराष्ट्रीय अनुभव, आधुनिक क्रिकेटची सखोल समज आणि स्पर्धात्मक संघ उभारण्याची क्षमता दिल्ली कॅपिटल्सच्या महिला संघासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, जयवर्धने दिल्ली कॅपिटल्समध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू वेणुगोपाल राव यांची जागा घेणार आहे. चार वर्षांहून अधिक काळ जबाबदारी सांभाळल्यानंतर राव यांनी पद सोडले. त्यांच्या कार्यकाळात दुबई कॅपिटल्सने 2025 मध्ये आयएलटी-20 स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: महेला जयवर्धनेची कोणत्या पदावर नियुक्ती झाली आहे?

    Ans: जीएमआर स्पोर्ट्सने महेला जयवर्धनेची क्रिकेट डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे.

  • Que: महेला जयवर्धनेकडे कोणत्या संघांची जबाबदारी असेल?

    Ans: महिला प्रीमियर लीगमधील दिल्ली कॅपिटल्स, आयएलटी-20 मधील दुबई कॅपिटल्स आणि द हंड्रेडमधील सदर्न ब्रेव्ह या संघांच्या क्रिकेटविषयक कामकाजाची जबाबदारी त्याच्याकडे असेल.

  • Que: महेला जयवर्धनेने मुंबई इंडियन्सला किती आयपीएल विजेतेपदे मिळवून दिली?

    Ans: मुख्य प्रशिक्षक म्हणून जयवर्धनेच्या मार्गदर्शनाखाली मुंबई इंडियन्सने तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले.

Web Title: Mahela jayawardene gmr sports cricket director delhi capitals wpl rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • Delhi Capitals
  • Mahela Jayawardene
  • mumbai indians

संबंधित बातम्या

Mumbai Indians: चाहत्यांना दणक्यावर दणके! मुंबई पलटणकडून 13 खेळाडू रिलीज; ‘या’ गोलंदाजाचा समावेश
1

Mumbai Indians: चाहत्यांना दणक्यावर दणके! मुंबई पलटणकडून 13 खेळाडू रिलीज; ‘या’ गोलंदाजाचा समावेश

IPL 2027 : ट्रेडच्या माध्यमातून हर्षल पटेल गुजरात टायटन्सच्या गोटात; सनरायजर्स हैदराबादने केले रिलीज
2

IPL 2027 : ट्रेडच्या माध्यमातून हर्षल पटेल गुजरात टायटन्सच्या गोटात; सनरायजर्स हैदराबादने केले रिलीज

Kieron Pollard : आरशात पाहून स्वतःलाच देतो कोचिंगचा सल्ला; पोलार्डचा मजेशीर खुलासा
3

Kieron Pollard : आरशात पाहून स्वतःलाच देतो कोचिंगचा सल्ला; पोलार्डचा मजेशीर खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.