Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2027 : ट्रेडच्या माध्यमातून हर्षल पटेल गुजरात टायटन्सच्या गोटात; सनरायजर्स हैदराबादने केले रिलीज

IPL 2027 साठी गुजरात टायटन्सने मोठी खेळी केली आहे. सनरायजर्स हैदराबादकडून हर्षल पटेलला ट्रेड करून संघात सामील केले आहे. 151 आयपीएल विकेट घेणाऱ्या हर्षलच्या समावेशामुळे गुजरातची गोलंदाजी अधिक मजबूत झाली आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 17, 2026 | 03:27 PM
IPL 2027 : ट्रेडच्या माध्यमातून हर्षल पटेल गुजरात टायटन्सच्या गोटात; सनरायजर्स हैदराबादने केले रिलीज

IPL 2027 : ट्रेडच्या माध्यमातून हर्षल पटेल गुजरात टायटन्सच्या गोटात; सनरायजर्स हैदराबादने केले रिलीज

Follow Us
Follow Us:
  • पटेलच्या खात्यात 151 विकेट
  • गुजरातमध्ये अनेक दमदार गोलंदाज
  • टी. नटराडन दिल्ली कॅपिटल्सच्या गोटात
 

IPL 2027 : हर्षल पटेल आयपीएल 2027 मध्ये गुजरात टायटन्ससाठी खेळताना दिसणार आहे. हर्षलला सनरायजर्स हैदराबादने (SRH) गुजरात टायटन्ससोबत ट्रेड केले आहे. पटेलच्या ट्रेडची अधिकृत घोषणा मंगळवारी आयपीएलच्या गव्हर्निंग बॉडीने केली. आयपीएलमध्ये दोन वेळा पर्पल कॅप जिंकलेला हर्षलच्या संघातील प्रवेशाने गुजरात टायटन्स (GT)ची गोलंदाजी बळकट झाली आहे.

हर्षल पटेलला आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये SRHने 8 कोटी रुपयात विकत घेतले होते. आता पटेल 4 कोटी रुपयांच्या तोट्यासह म्हणजेच 4 कोटी रुपयांच्या करारावर गुजरात टायटन्समध्ये समाविष्ट झाला आहे. या देवाण-घेवाण प्रक्रियेमुळे पटेल आता आपल्या राज्यातील संघाकडून खेळताना दिसेल. अहमदाबादमध्ये जन्मलेल्या या पेसरने 2025-26 च्या सत्रात स्थानिक क्रिकेटमध्ये गुजरातचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुनरागमन केले आहे.

पटेलच्या खात्यात 151 विकेट

पटेलला आयपीएलचा मोठा अनुभव आहे. त्याने सर्वोत्तम गोलंदाजीच्या जोरावर आपली ओळख निर्माण झाली. त्याला अखेरच्या षटकातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ओळखले जाते. पटेलने 2012 मध्ये आयपीएल डेब्यूनंतर 124 सामन्यात 151 विकेट प्राप्त केले. त्याने दोन वेळा पर्पल कॅप जिंकली. 2021 आणि 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि पंजाब किंग्ज (PBKS)चे प्रतिनिधित्व करताना स्पर्धेतील सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज राहिला.
हर्षलने आयपीएल 2025 मध्ये 13 सामन्यात 16 विकेट घेतले. मागील हंगाम मात्र त्याच्यासाठी चांगला राहिला नाही. तो फक्त 5 सामने खेळू शकला, ज्यात त्याला एकही विकेट मिळाला नाही.

दोन वाघ मैदानात पुन्हा कधी दिसणार? Rohit & Virat ‘या’ सिरीजमध्ये खेळताना दिसणार; मोठी अपडेट समोर

गुजरातमध्ये अनेक दमदार गोलंदाज

GT मध्ये वेगवान गोलंदाजाच्या रुपात कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, जेसन होल्डर आणि अशोक शर्मासारखे दमदार गोलंदाज अगोदर उपस्थित आहेत. अशात हर्षल या गोलंदाजी आक्रमणाला आणखीन धार देऊ शकतो. आयपीएलमध्ये पटेल RCB, SRH, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) साठी खेळला आहे.

पटेलने भारतीय क्रिकेट संघाच्या वतीने 25 टी-20 सामन्यात 29 विकेट घेतले आहेत. SRH ने अगोदरच दिल्ली कॅपिटल्स (DC) कडून टी. नटराजनला आपल्या गटात घेत आपली गोलंदाजी बळकट केली आहे. नटराजनला DC कडून मागील दोन सामन्यात म्हणावी तशी संधी मिळाली नाही. SRHने चेन्नई सुपर किंग्ज (CSK)कडून वेगवान गोलंदाज खलील अहमद आणि नाथन एलिसलाही संघात समाविष्ट करण्यात आले.

IND Vs NZ: मोठा हादरा, मोठं नुकसान; टेस्ट सिरीज सुरू होण्याअगोदरच ‘हा’ खेळाडू झाला बाहेर, आता…

💡

Frequently Asked Questions

  • Que: IPL 2027 मध्ये हर्षल पटेल कोणत्या संघाकडून खेळणार आहे?

    Ans: हर्षल पटेल IPL 2027 मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना दिसणार आहे.

  • Que: हर्षल पटेलला गुजरात टायटन्सने कोणत्या संघाकडून ट्रेड केले?

    Ans: गुजरात टायटन्सने सनरायजर्स हैदराबादकडून हर्षल पटेलला ट्रेड केले आहे.

  • Que: गुजरात टायटन्समध्ये कोणते प्रमुख वेगवान गोलंदाज आहेत?

    Ans: गुजरात टायटन्सच्या संघात कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, जेसन होल्डर आणि अशोक शर्मा यांसारखे वेगवान गोलंदाज आहेत.

Web Title: Ipl 2027 harshal patel trade gujarat titans srh t natarajan rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • Delhi Capitals
  • IPL
  • Sunrisers Hyderabad

संबंधित बातम्या

MS Dhoni Retirement: ‘हेलिकॉप्टर’ शॉट कायमचा थंड; लाडक्या ‘थाला’ने ठोकला रामराम; IPL मधून निवृत्त
1

MS Dhoni Retirement: ‘हेलिकॉप्टर’ शॉट कायमचा थंड; लाडक्या ‘थाला’ने ठोकला रामराम; IPL मधून निवृत्त

IPL 2027: सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का! अभिषेक – ट्रॅव्हिस हेडची जोडी तुटली; काय आहे कारण
2

IPL 2027: सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का! अभिषेक – ट्रॅव्हिस हेडची जोडी तुटली; काय आहे कारण

Arshdeep Singh Engagement : अर्शदीप सिंगच्या आयुष्यात नवी इनिंग! अभिनेत्री समरीन कौरसोबत उरकला साखरपुडा
3

Arshdeep Singh Engagement : अर्शदीप सिंगच्या आयुष्यात नवी इनिंग! अभिनेत्री समरीन कौरसोबत उरकला साखरपुडा

IPL Breaking: मोठा धमाका होणार! ‘हे’ झाल्यास पोरं नाय ऐकणार; 2028 मध्ये दोन नवीन संघ एन्ट्री घेणार?
4

IPL Breaking: मोठा धमाका होणार! ‘हे’ झाल्यास पोरं नाय ऐकणार; 2028 मध्ये दोन नवीन संघ एन्ट्री घेणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.